Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार

Ex Pakistani Cricketer PM Modi Help: या पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीयांचं आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. भारतीय नागरिकत्वासंर्भातही या खेळाडूने सूचक वक्तव्य केलं आहे.

'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार

Ex Pakistani Cricketer PM Modi Help: पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधा नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे एका गोष्टीसाठी मदत मागितली आहे. आपण हिंदू असल्याने पाकिस्तानमध्ये आपल्याला फार संघर्ष करावा लागला असं दानिश कनेरियाने म्हटलं आहे. शाहिद आफ्रिदीने अनेकदा माझ्यावर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला असा धक्कादायक दावाही दानिश कनेरियाने केला आहे. मात्र आपल्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला जात होता तरी आपण धर्म सोडला नाही. 

अनेक गोष्टींबद्दल केलं भाष्य

42 वर्षीय दानिश कनेरियाने 'आजतक' या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानमधील हिंदूंची परिस्थिती, मैदानावर नमाज पठण आणि धर्मपरिवर्तनासारख्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं. इतकेच नाही तर त्याने भारतीयांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं. तसेच त्याने मोदी आणि बीसीसीआयकडे एक मागणीही केली. 

भारतामध्ये सर्वांचं समर्थन केलं जातं

'भारतामधील लोक एकजुटीने राहतात. एका स्पर्धेमध्ये शामीला ट्रोल करण्यात आलं तर विराट कोहली आणि इतर खेळाडू पुढे आले आणि त्यांनी शामीला पाठिंबा दिला. भारत आणि पाकिस्तानमध्ये हा फार मोठा फरक आहे. केवळ शामीच नाही तर इरफान पठाण, युसूफ पठाण आणि अझरुद्दीनही संघाचा भाग होते. अझरुद्दीनबरोबरही बरंच काही घडलं पण सर्वांना त्याला पाठिंबा दिला. भारतामध्ये सर्व धर्मांना सन्मान दिला जातो. मात्र पाकिस्तानमध्ये अशी स्थिती नाही,' असं दानिश कनेरिया म्हटला आहे.

भारतीय नागरिकत्व स्वीकारणार का?

दानिश कनेरियाला संधी दिल्यास तो भारतीय नागरिकत्व स्वीकारेल का असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्याने, "नक्कीच, मी मोदींचं अभिनंदन करु इच्छितो. भारतामध्ये विकास झाला आहे. नागरिकत्व घेणं, न घेणं हा प्रश्न नाही पण संधी मिळाली तर नक्की नागरिकत्व स्वीकारेन," असं उत्तर दिलं. 

मोदी आणि बीसीसीआयकडे मागितली मदत

दानिश कनेरियाने आपण भारताचं कौतुक केल्यानंतर आपल्याला देशद्रोही म्हटलं जातं असा दावा केला. सध्या दानिश कनेरिया ब्रिटनमध्ये स्थायिक झाला आहे. त्यामुळे कटुंबासहित पुन्हा पाकिस्तानमध्ये परत याययची की आहे तिथेच राहायचं याबद्दल दानिश कनेरिया गोंधळलेल्या अवस्थेत आहे. "मी नरेंद्र मोदींना आणि बीसीसीआयला आवाहन करु इच्छितो की माझ्यावर इंग्लिश क्रिकेट बोर्डाने केलेले आरोप आणि घातलेली बंदी रद्द करण्यासाठी मदत करावी," असंही दानिश कनेरियाने मुलाखतीत म्हटलं आहे.

वर्ल्ड कप 2023 बद्दल दानिश कनेरिया काय म्हणाला?

दानिश कनेरियाने यंदाच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानच्या अवस्थेबद्दल बोलताना पाकिस्तानी संघ अव्वल 4 मध्ये आला तरी खूप झालं असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ दमदार कामगिरी करत असून वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानला जात आहे, असं दानिश कनेरियानेचं म्हणणं आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरमध्ये आपल्याला विराट कोहली अधिक श्रेष्ठ वाटतो असंही दानिश कनेरियाने म्हटलं आहे.

Read More