Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : शाकीब अल हसनचा विक्रम, युवराजचा रेकॉर्ड मोडला

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने विक्रमाला गवसणी घातली आहे.

World Cup 2019 : शाकीब अल हसनचा विक्रम, युवराजचा रेकॉर्ड मोडला

साऊथम्पटन : अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने विक्रमाला गवसणी घातली आहे. शाकिब अल हसनने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ४७६ रन केले आहेत आणि १० विकेटही घेतल्या आहेत. एका वर्ल्ड कपमध्ये ४०० पेक्षा जास्त रन आणि १० विकेट घेण्याचा विक्रम कोणत्याही क्रिकेटपटूला करता आला नव्हता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये शाकीब अल हसनने अर्धशतक केलं आणि मग ५ विकेटही घेतल्या. याआधी भारताचा ऑलराऊंडर युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कपमध्ये अशीच कामगिरी केली होती. आयर्लंडविरुद्ध युवराज सिंगने अर्धशतक केलं आणि ५ विकेट घेतल्या.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशचा ६२ रननी विजय झाला. शाकीबने १० ओव्हरमध्ये २९ रन देऊन ५ विकेट घेतल्या. तर बॅटिंग करताना त्याने ५१ रनची खेळी केली. या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. याच मॅचमध्ये शाकीब वर्ल्ड कपमध्ये १ हजार रन पूर्ण करणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू बनला. शाकीबने या वर्ल्ड कपमध्ये २ शतकं केली आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाबरोबरच बांगलादेश वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम आहे. पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेशची टीम ७ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने ७ पैकी ३ मॅचमध्ये विजय झाला, तर ३ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. बांगलादेशची एक मॅच पावसामुळे रद्द झाली.

Read More