Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019: वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे.

World Cup 2019: वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

लंडन : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कप जिंकणारी टीम आपलं वर्चस्व तर सिद्ध करेलच याखेरीज तो कोट्यवधीही होईल. वर्ल्ड कपमध्ये १० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७० कोटींची बक्षीसं वाटण्यात येणार आहेत. विजेत्या टीमला २८ कोटींचं बक्षीस प्रदान करण्यात येईल. आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धांमधील हे सर्वाधिक रकमेचं बक्षीस आहे.

उपविजेत्या टीमला २० लाख डॉलरच्या बक्षीसानं गौरवण्यात येईल. उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमला ८ लाख डॉलर, तर प्रत्येक साखळी सामन्यातील विजेत्या टीमला ४० हजार डॉलर प्रदान करण्यात येतील. साखळी सामन्यातून आगामी फेरीत दाखल होणाऱ्या टीमला एक लाख डॉलर देण्यात येतील.

यंदाचा वर्ल्ड कपमध्ये १० देश सहभागी झाले आहेत. वर्ल्ड कप हा यावेळी राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक टीम ९ मॅच खेळेल. यानंतर टॉप-४ टीम सेफी फायनलमध्ये पोहोचतील. सेमी फायनल जिंकलेल्या दोन्ही टीममध्ये फायनलचा सामना रंगेल. १४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. ९ जुलै आणि ११ जुलैला दोन सेमी फायनल होणार आहेत. 

Read More