Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला 'जोर का झटका', 'या' खेळाडूची आयपीएलमधून सुट्टी?

David Warner In IPL 2024 : दुखापतग्रस्त झाल्याने डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटने (Cricket Austrelia) खुलासा केला आहे.

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला 'जोर का झटका', 'या' खेळाडूची आयपीएलमधून सुट्टी?

Delhi Capitals latest news : सर्वांना उत्सुकता असलेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL 2024) पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलं आहे. आयपीएलच्या 17 व्या  हंगामात 17 दिवसात 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 10 शहरात आयपीएल खेळवली जाईल. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) होम ग्राऊंड असणाऱ्या दिल्लीच्या अरूण जेठली मैदानावर एकही सामना खेळवला जाणार नाही. त्यामुळे खेळाडूंची तसेच चाहत्यांची देखील निराशा झाली आहे. अशातच आता दिल्ली कॅपिटल्स संघाला आणखी एक धक्का बसला आहे. मागील हंगामात कॅप्टन्सी सांभाळणारा डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुखापतग्रस्त असल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिली आहे.

टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डेव्हिड वॉर्नरला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये. त्याला नीट होण्यासाठी 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. दुखापतग्रस्त झाल्याने डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटने खुलासा केला आहे.

आयपीएल खेळणार का?

डेव्हिड वॉर्नरला तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण त्याचा आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्सने सुटकेचा श्वास घेतला आहे.

कसे असतील DC चे सामने?

पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स एकूण पाच सामने खेळणार आहे. दिल्लीच्या मिशन आयपीएलची सुरुवात 23 मार्चपासून होईल. पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध रंगणार आहे. हा सामना मोहालीत खेळला जाणार आहे. यानंतर 28 मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध, तिसरा सामना 31 मार्चला चेन्नईविरुद्ध, 3 एप्रिलला केकेआरविरुद्ध आणि 7 एप्रिलला मुबंईविरुद्ध दिल्ली खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 31 मार्च आणि 3 एप्रिलचे सामने विशाखापट्टणमध्ये खेळवले जाणार आहेत. 

दिल्ली कॅपिटल्सचा संघ - 

ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, कुमार कुशाग्र, सुमित कुमार, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, झाय रिचर्डसन, हॅरी ब्रूक, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, खलील अहमद, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल, स्वास्तिक छिकारा, रिकी भुई, रसिख डार, प्रवीण दुबे, मुकेश कुमार.

Read More