Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?

Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे. 

IND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?

IND v ENG DRS : विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी दणक्यात विजय नोंदवला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. मात्र, दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी डीआरएस (DRS) वरून वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच भडकल्याचं पहायला मिळालं. अंपायरने निर्णय का बदलला? आयसीसीचा नियम काय असतो?

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरूवात करून दिली. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा सुर आवळला. 220 वर 6 गडी बाद अशी परिस्थिती इंग्लंडची झाली होती. त्यावेळी बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांनी इंग्लंडला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बेन स्टोक्सची विकेट गेली अन् टीम इंडियाने सुटकेचा श्वास घेतला. मात्र, हार्टली आणि फोक्स यांनी 55 धावांची पार्टनरशीप करून रोहितला पुन्हा संकटात टाकलं. टीम इंडियाला आता आणखी एका विकेटची अपेक्षा होती.

रोहितने पुन्हा फिरकी गोलंदाज आर आश्विनला गोलंदाजीला आणलं अन् आश्विनने देखील निराश केलं नाही. आश्विनला स्विप मारण्याच्या नादात हार्टलीने रोहितच्या हातात कॅच सोपवला. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आनंदोस्तव साजरा केला. मात्र, इंग्लंडने रिव्ह्यू घेतल्याने खेळ पलटला. एलबीडब्ल्यूचा रिव्हव्यू इंग्लंडने घेतला होता. मात्र, अंपारयने अंपायर्स कॉल दिला तरीही हार्टलीला नाबाद घोषित केलं. थर्ड अंपायरने डीआरएसमध्ये चेंडू त्याच्या मनगटाला लागल्याचं सांगितलं. त्यामुळे रोहित शर्मा संतापल्याचं दिसून आला.

ICC चा नियम काय सांगतो?

दरम्यान, आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे. बॉल ट्रॅकिंग, एलबीडब्ल्यू, कॅच आऊट किंवा स्टंपिंग देखील डीआरएसमध्ये पहाव्या लागतात.

इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.

Read More