Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2024 : निवृत्तीसाठी नाही तर 'या' कारणामुळे धोनीने कॅप्टन्सी सोडली; ख्रिस गेलचा खुलासा!

Chris Gayle Prediction On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने अचानक कॅप्टन्सी का सोडली? यावर ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलं आहे.

IPL 2024 : निवृत्तीसाठी नाही तर 'या' कारणामुळे धोनीने कॅप्टन्सी सोडली; ख्रिस गेलचा खुलासा!

MS Dhoni stepping down as Captain : आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा (RCB Vs CSK Result) पराभव केलाय. मात्र, त्याआधी थाला धोनीच्या (MS Dhoni) फॅन्सला मोठा धक्का बसला. वर्षानुवर्षे चेन्नई सुपर किंग्जसाठी कॅप्टन्सी करणाऱ्या धोनीने कॅप्टन्सीवरून पायउतार झाला अन् युवा ऋतुराज गायकवाडवर (Ruturaj Gaikwad) सीएसकेची जबाबदारी दिली. धोनीच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. महेंद्रसिंह धोनीने कॅप्टन्सी सोडणं ही खूप मोठी चूक आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं, असं एबी डिव्हिलियर्स म्हणतो. तर धोनीने कॅप्टन्सी सोडल्यावर आरसीबीचा माजी स्टार फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) याने धोनीच्या निर्णयाचं कारण सांगितलं आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी कदाचित सर्व सामने खेळणार नाही. असं होऊ शकतं की, धोनी आयपीएलमधून थोडा ब्रेक घेऊ शकतो. मला वाचतं की, धोनीने यासाठीच कदाचित कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र, यंदाच्या हंगामात धोनी नक्कीच चांगली कामगिरी करेल, त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची गरज नाही, असंही यूनिवर्स बॉस ख्रिस गेलने म्हटलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान ख्रिस गेलने हे वक्तव्य केलं.

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरुचा 6 विकेट्स राखून पराभव केला. तसेच आयपीएलच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 6  विकेट्स गमावून 173 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने 8 चेंडू बाकी असताना 176 रन्स करुन सामना जिंकला. रचिन रवींद्रने 15 धावा करत 37 धावा केल्या. तर मुस्ताफिजूर रेहमानने 4 विकेट्स नावावर केल्या होत्या.

कसा आहे चेन्नईचा संघ? 

एमएस धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद,  निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.

Read More