Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका

Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.

माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका

Manoj Tiwary Criticized MS Dhoni : टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बंगालचा कर्णधार असलेल्या मनोज तिवारीने ईडन गार्डन्स मैदानावर बिहारविरूद्ध (Bihar vs Bengal) अखेरचा सामना खेळला. ईडन गार्डन्सवर अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळाल्याने मनोज तिवारीने आनंद व्यक्त केलाय. मात्र, निवृत्तीनंतर मनोज तिवारीने असे काही फटाके फोडले आहेत की, त्यामुळे क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.

काय म्हणाला Manoj Tiwary?

मी महेंद्रसिंग धोनीला विचारू इच्छितो की, मला संघातून का वगळण्यात आले? तर मागील सामन्यात म्हणजेच वेस्ट इंडिजविरुद्ध मी शतक झळकावलं होतं, तरी देखील धोनीने माझा विचार केला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोणीही धावा काढत नव्हतं. विराट कोहली, रोहित शर्मा किंवा सुरेश रैना दोघंही धावा काढत नव्हते. तरीही त्यांना कायम ठेवलं अन् मला बाहेरचा रस्ता दाखवला. धोनीने असं का केलं? माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. पण मी धोनीला विचारू इच्छितो की शतक झळकावूनही मला संघाबाहेर का फेकलं गेलं? असा सवाल मनोज तिवारीने विचारला आहे.

शतकानंतरही मला सलग 14 सामन्यांची प्रतीक्षा का करायला लावली? सामनावीराचा पुरस्कार मिळून देखील मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का घेण्यात आलं नाही? असा सवाल मनोज तिवारीने निवृत्तीनंतर सोमवारी न्यूज 18 शी बोलताना विचारला आहे. मला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मला त्याच्याकडून ऐकायचं आहे. मी हा प्रश्न नक्कीच विचारेन, असं म्हणत मनोज तिवारीने धोनीला धारेवर धरलं आहे.

Manoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!

दरम्यान, युवराज सिंगने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप प्रयत्न केले त्यानंतर त्याला भारतीय निवडकर्त्यांनी त्याला प्राधान्य दिलं. मग मला वेगळी वागणूक का दिली? कसोटी कॅप गमावणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी खंत होती. जेव्हा आत्मविश्वास शिखरावर असतो, तेव्हा असं कोणीतरी येऊन तुमचा विनाश करतो. त्यामुळे एखादा चांगला प्लेयर मरून जातो, असंही मनोज तिवारीने भेदडकपणे म्हटलं आहे.

Read More