Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएल 2018: कोणाला मिळणार पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी?

इंडियन प्रीमियर लीग सीजन-11 चा लिलाव संपला आहे. लिलावादरम्यान टीमच्या मालकांना खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. पण एका टीमपुढे अजूनही एक संकट उभं आहे.

आयपीएल 2018: कोणाला मिळणार पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी?

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग सीजन-11 चा लिलाव संपला आहे. लिलावादरम्यान टीमच्या मालकांना खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. पण एका टीमपुढे अजूनही एक संकट उभं आहे.

कोणाला बनवणार कर्णधार

कर्णधार कोणाला करायचं याबाबतीत किंग्स इलेवन पंजाब संकटात सापडली आहे. लवकरच नव्या कर्णधाराची घोषणा होणार आहे. असं बोललं जातंय.  मीडिया रिपोर्ट्सनुसार 7.6 कोटीमध्ये खरेदी केलेल्या रविचंद्रन अश्विनला कर्णधार बनवलं जाऊ शकतो. टीममध्ये युवराज सिंग, अॅरॉन फिंच, ख्रिस गेल आणि अक्षर पटेल यांच्यासारखे खेळाडू देखील आहेत. यांच्यावर देखील विचार केला जाऊ शकतो.

लोकांना विचारलं मत

किंग्स इलेवन पंजाबच्या टीमने त्यांच्या वेबसाईटवर काही खेळाडूंची यादी टाकली आहे. ज्यामध्ये विचारण्यात आलं होतं की कोणाला कर्णधार बनवण्यात यावं. यामध्ये सर्वाधिक मतं अश्विन आणि युवराज सिंगला मिळाले होते.

सेहवाग घेणार निर्णय

टीम मॅनेजमेंट आणि मेंटॉर वीरेंद्र सेहवाग आता याबाबत निर्णय घेणार आहे. टीमला कोण आयपीएलचा कप जिंकवून देऊ शकतो अशा खेळाडूचा विचार केला जाणार आहे. मागच्या सीजनमध्ये पंजाबने अनेक कर्णधार बदलले. 14 पैकी फक्त 7 सामने त्यांनी मागच्या सीजनमध्ये जिंकले होते.

Read More