Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2023 : पाकिस्तानला भूतानं झपाटलं? इफ्तिकार अहमद कोणाशी बोलतोय? खळबळजनक Video व्हायरल

Iftikhar Ahmed Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना यंदाच्या वर्ल्ड कपमधील उलटफेर करणारा ठरला. पाकिस्तानच्या पराभवानंतर जगभरात त्यांनी नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानला भुतानं झपाटलंय की का? असा सवाल विचारला जात आहे. त्याला कारण इफ्तिकार अहमद याचा व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडीओ...

World Cup 2023 : पाकिस्तानला भूतानं झपाटलं? इफ्तिकार अहमद कोणाशी बोलतोय? खळबळजनक Video व्हायरल

PAK vs AFG, World Cup 2023 : अफगाणिस्ताने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) मोठा उलटफेर केला. अफगाणिस्ताने तगड्या पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभवाची धुळ चारली. त्यामुळे आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित बिघडल्याचं पहायला मिळतंय. अफगाणिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला टीकेला सामोरं जावं लागलंय. पराभवानंतर पाकिस्तान संघात देखील वाद टोकाला गेल्याचं दिसतंय. अशातच आता पाकिस्तान संघाला (Pakistan Cricket Team) भूताने झपाटल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. अशी चर्चा का होतेय? पाहुया...

झालं असं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना चालू होता. अफगाणिस्तानच्या संघाचा डाव सुरू असताना पाकिस्ताचं टेन्शन वाढलं होतं. गुरबाज आणि इब्राइम यांनी पाकिस्तानच्या नाकात दम केला होता. त्यावेळचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतोय, यामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिकार अहमद (Iftikhar Ahmed) कोणाशी तरी बोलत असल्याचं दिसत आहे. तुम्ही म्हणाल की, बोलतोय म्हणून काय झालं? पण, इफ्तिकार बोलत असताना त्याच्या आसपास कोणीही नसल्याचं दिसतंय.

पाहा Video

पाकिस्तानचा शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान 26 व्या ओव्हरमध्ये कोणाला ओव्हर द्यावी, यावर चर्चा करत होते. त्यावेळी शाहीनने शाबादला काहीतरी समजवत असल्याचं दिसतंय. मात्र, इफ्तिकार अहमद (Iftikhar Ahmed) त्यावेळी एकटाच बडबडत असल्याचं दिसून आला. त्यामुळे पाकिस्तान संघाला भूताने झपाटलं की काय? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. 

दरम्यान, तीन पराभवानंतर आता पाकिस्तानला त्यांचे उर्वरित सामने जिंकावे लागतील आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरायचे असल्यास काही अनुकूल निकालांचीही आशा आहे. मात्र, पाकिस्तानसमोर अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचं तगडं आव्हान असणार आहे. 

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.

Read More