Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अटीतटीच्या मॅचमध्ये विजय मिळवून वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमध्ये पात्र

२०१९च्या वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजची टीम क्वालिफाय झाली आहे. 

अटीतटीच्या मॅचमध्ये विजय मिळवून वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमध्ये पात्र

हरारे : २०१९च्या वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजची टीम क्वालिफाय झाली आहे. झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या क्वालिफिकेशन राऊंडच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडवर विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमामुळे वेस्ट इंडिजचा ५ रन्सनं विजय झाला.

या मॅचमध्ये स्कॉटलंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. स्कॉटलंडच्या बॉलरनं वेस्ट इंडिजला फक्त १९८ रन्सवर रोखलं. वेस्ट इंडिजच्या लुईसनं सर्वाधिक ६६ तर मार्लोन सॅम्युअल्सनं ५१ रन्स केल्या. स्कॉटलंडच्या शरीफ आणि व्हील यांनी वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी ३ बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं.

वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या १९९ रन्सचा पाठलाग करताना स्कॉटलंडनं ३५.२ ओव्हरमध्ये १२५/५ एवढ्या रन्सपर्यंत मजल मारली. पण पावसाला सुरुवात झाल्यामुळे मॅच पुढे होऊ शकली नाही. अखेर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार वेस्ट इंडिजला विजयी घोषीत करण्यात आलं.

३० सप्टेंबर २०१७च्या आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये टॉप ८ टीममध्ये वेस्ट इंडिज नसल्यामुळे त्यांना वर्ल्ड कप क्वालिफायर राऊंड खेळावा लागला. या क्वालिफाय राऊंडमध्ये विजय झाल्यामुळे वेस्ट इंडिज आता २०१९चा वर्ल्ड कप खेळू शकणार आहे. 

Read More