Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

३४ फोर २८५ रन्स ४० व्या वर्षी वसीम जाफरचा रेकॉर्ड!

नागपूरच्या मैदानावर विदर्भाकडून खेळताना धडाकेबाज खेळाडू वासिम जाफरने इराणी करंडकाच्या इतिहासातला नवा विक्रम केलाय. त्यांने ४० व्या वर्षी ३४ फोर मारत २८५ रन्स केल्यात.

३४ फोर २८५ रन्स ४० व्या वर्षी वसीम जाफरचा रेकॉर्ड!

मुंबई : नागपूरच्या मैदानावर विदर्भाकडून खेळताना धडाकेबाज खेळाडू वासिम जाफरने इराणी करंडकाच्या इतिहासातला नवा विक्रम केलाय. त्यांने ४० व्या वर्षी ३४ फोर मारत २८५ रन्स केल्यात.

जाफरची चौफेर फटकेबाजी

जाफरने आपल्या नावावर एक विक्रम केलाय. विदर्भ विरुद्ध शेष भारत संघामध्ये इराणी करंडकाचा सामना नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर सुरु आहे. त्यावेळी जाफरने चौफेर फटकेबाजी केली.

मुरली विजयचा मोडला रेकॉर्ड

विदर्भाने दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद ५९८ रन्स केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी जाफर २८५ रन्सवर खेळत होता. त्याने  तामिळनाडूच्या मुरली विजयच्या नावावरचा २६६ रन्सचा असलेला रेकॉर्ड मोडीत काढत आपल्या नावावर नोंद केलेय.

सहावा भारतीय खेळाडू

जाफरने देशांतर्गत क्रिकेटमध्येही तब्बल १८ हजार रन्स पूर्ण केल्या आहेत. १८ हजार रन्स करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. २४२ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ५३ शतके आणि ८६ अर्धशतकांच्या जोरावर हा विक्रम नोंदवलाय.

जाफरच्या आधी सुनील गावस्कर २५ हजार ८३४ रन्स, सचिन तेंडुलकर २५ हजार३९६ रन्स, राहुल द्रविड २३ हजार ७९४ रन्स तर व्हीव्हीएस लक्ष्मण  १९ हजार ७३० रन्स तर विजय हजारे १८ हजार ७४० रन्स केल्यात. 

Read More