Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शिखर धवनने नकळत सेहवागला दिलं होतं दुःख, निवृत्ती घेतल्यावर पोस्ट लिहून केला खुलासा

वीरेंद्र  सेहवागने एका पोस्टद्वारे धवन याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या.   

शिखर धवनने नकळत सेहवागला दिलं होतं दुःख, निवृत्ती घेतल्यावर पोस्ट लिहून केला खुलासा

Virendra Sehwag On Shikhar Dhawan Retirement : भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने शनिवारी अचानकपणे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. यापैकी एक नाव वीरेंद्र सेहवाग याचे सुद्धा होते. सेहवागने एका पोस्टद्वारे धवन याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या.   

शिखर धवनने 2010 रोजी टीम इंडियाकडून वनडेमध्ये पदार्पण केले. 2011 मध्ये टीम इंडियाकडून त्याला टी 20 क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. परंतु सुरुवातीला धवन खास कामगिरी करण्यात यशस्वी झाले नव्हते. लागोपाठ संघर्ष केल्यावर 2013 पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार प्रदर्शन करायला सुरुवात केली. त्यावेळी इंग्लंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला टूर्नामेंट ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये देखील धवनने त्याचा हाच फॉर्म कायम ठेवला. यावेळी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग हे खराब फॉर्ममधून जात होते. ज्यामुळे सेहवागच्या जागी शिखर धवनला खेळण्याची संधी मिळाली होती. आता शिखर धवनने निवृत्ती जाहीर केल्यावर वीरेंद्र सेहवागने हीच गोष्ट सांगत धवनसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग? 

वीरेंद्र सेहवागने सोशल मीडिया पोस्ट लिहीत म्हंटले, "शिखर तुला खूप शुभेच्छा. मोहाली येथे जेव्हा तू माझी जागा घेतली होतीस, तिथपासून तू पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाहीस आणि काहीच वर्षात तू खूप चांगले प्रदर्शन केलेस. तू नेहमी मौज मजा करत राहा आणि जीवन भरपूर जग. माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहेत."  

हेही वाचा : Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?

निवृत्ती जाहीर करताना काय म्हणाला धवन?

"मी माझ्या क्रिकेट करिअरमधील हे पर्व संपवत आहे. मी माझ्यासोबत असंख्या आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आभार! जय हिंद," असा कॅप्शनसहीत त्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिखर धवने 1 मिनिट 17 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने, "नमस्कार सर्वांना, आज मी एका अशा वळणावर उभा आहे जिथून मागे पाहिल्यास केवळ आठवणी दिसतात आणि पुढे पाहिल्यास संपूर्ण आयुष्य आहे. भारतीय संघासाठी खेळण्याचं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर् णझालं. मी यासाठी अनेकांचे आभार मानू इच्छितो. सर्वात आधी माझे कुटुंबीय, लहानपणीचे माझे प्रशिक्षक तारक सिन्हाजी, मदन शर्माजी यांचा मी आभारी आहे. मी यांच्या प्रशिक्षणाअंतर्गच क्रिकेट शिकलो," असं शेखर म्हणाला.

Read More