Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

एकेकाळी दुर्लक्ष पण आज तोच बॉलर झालाय विराट कोहलीचा फेव्हरेट

एकेकाळी दुर्लक्ष पण आज तोच बॉलर झालाय विराट कोहलीचा फेव्हरेट... जर तेव्हा टीममध्ये घेतलं असतं तर RCB कडे आज ट्रॉफी असती

एकेकाळी दुर्लक्ष पण आज तोच बॉलर झालाय विराट कोहलीचा फेव्हरेट

मुंबई : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी स्टार असलेला बॉलर एकेकाळी विराटला अजिबात आवडत नव्हता. जगभरात खतरनाक बॉलर म्हणून त्याची आज ओळख आहे. 2014 मध्ये जेव्हा RCB मध्ये घेण्याबाबत त्याचा विचार झाला तेव्हा कोहलीनं दुर्लक्ष केलं. मात्र त्याच गोष्टीचा पश्चाताप आज कोहलीला करण्याची वेळ आली.

जर हा घातक बॉलर RCB मध्ये असता तर आतापर्यंत टीमला ट्रॉफी मिळाली असती. हा बॉलर दुसरा तिसरा कोणी नसून जसप्रीत बुमराह आहे. एकेकाळी विराट कोहलीनं त्याला RCB संघात घेण्यासाठी नकार दिला होता. आज मात्र तो कोहलीचा सर्वात फेव्हरेट बॉलर आहे. 

कोहलीला आवडला नव्हता बुमराह

कोहलीला सुरुवातीला बुमराह अजिबात आवडत नव्हता. ही गोष्ट पार्थिव पटेलनं संपूर्ण जगाला सांगितली. बुमराहला RCB मध्ये घेण्यासाठी देखील कोहलीचा विरोध होता. 

2014 मध्ये विराट कोहलीनं त्याला टीममध्ये घेण्यासाठी नकार दिला होता असही पार्थिव पेटलनं सांगितलं. त्यावेळी विराट रागात म्हणाला होता  'ये बुमराह-वुमराह क्या कर लेगा?' असं विराटचं वाक्य त्यावेळी होतं अशी माहिती पार्थिव पटेलनं दिली. 

पार्थिव पटेलनं हे सांगितलं खरं मात्र त्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात एकच चर्चा सुरू झाली. आज बुमराहने आपलं नाव आपल्या कामातून एवढं मोठं केलंय की आयपीएलचा प्रत्येक संघ त्याला घेण्यासाठी धडपड करतोय.

विराट कोहली कर्णधारपदी आल्यानंतर बुमराहला त्याने प्रथम प्राधान्य दिलं. बुमराहने स्वत:ला सिद्ध केलं. बुमराहशिवाय विराटचं पान तो कर्णधार असताना हलत नव्हतं. सर्वात भरवशाचा खेळाडू आणि उत्तम कामगिरी करणारा म्हणून बुमराहचंच नाव पुढे यायचं.

fallbacks

बुमराहने आतापर्यंत अनेक वेळा आपल्या गोलंदाजीने मुंबई संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मात्र बुमराहला पहिल्या सामन्यात फारसं यश मिळालं नाही. बुमराहची 15 व्या हंगामातील सुरुवात खराब झाली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात त्याने 42 धावा दिल्या आणि एकही विकेट घेण्यात यश आलं नाही.

बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससोबत 10  वर्षे पूर्ण केली. हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असल्याचं मानलं जातं. बुमराहने आयपीएलच्या 107 सामन्यात 130 विकेट घेतल्या आहेत. IPL 2022 साठी मुंबई इंडियन्सने बुमराहला 12 कोटींना रिटेन केलं. 

Read More