Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NED : शॉट ऑफ द मॅच...बॉल गोळीगत बॉन्ड्रीपार गेला, विराटलाही बसला धक्का!

Virat Kohli flat six in IND vs NED : चेंडू एवढा गोळीगत केला की, अनेकांना डोळ्यावर विश्वासच बसेना, हा शॉट पाहून विराटला देखील आश्चर्य वाटलं. त्यावेळी त्याने सुर्यकुमारकडे पाहून भन्नाट रिकॅशन देखील दिली. 

IND vs NED : शॉट ऑफ द मॅच...बॉल गोळीगत बॉन्ड्रीपार गेला, विराटलाही बसला धक्का!

Virat Kohli, T20 World Cup 2022:  भारत आणि नेदरलँड (India vs netherlands) यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फलंदाजी केली. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर के.एल राहुल (KL Rahul) मात्र पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत तुफान मारा केला आणि नेदरलँडला सिडनीमध्ये धुळ चारली.

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात चांगली झाली नाही. भारताचा (T20 world cup) चिंतेचा विषय असलेला के एल राहुल पुन्हा एकदा नापास ठरला. राहुलला 12 चेंडूत फक्त 9 धावा करता आल्या. तर दुसरीकडे रोहित शर्माने (Rohit Sharma) आज चांगली सुरूवात करून दिली. रोहितने 39 चेंडूत 53 धावांची वादळी पारी खेळली. मात्र, भारताचा रनरेट चांगला नव्हता. त्यावेळी मैदानात सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) एन्ट्री झाली.

आणखी वाचा - जमलं हो जमलं! IND vs NED सामन्यात तरुणानं केलं प्रपोज अन् सर्वांसमोर...पाहा Video

सुर्यकुमार आणि विराटने जबाबदारी खांद्यावर घेऊन आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्यामुळे सामन्यात आणखी रंगत आल्याचं दिसून आलं. विराट कोहलीने ताबडतोब धावा करत 62 धावा चोपल्या. मात्र, या इनिंगमध्ये कोहलीचा एक फ्लॅट सिक्स सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. विराटने (Virat Kohli flat six) 17 ओव्हरच्या तिसरा चेंडू डीप एक्स्ट्रा स्वेअर लेगच्या दिशेने टोलवला.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, हा चेंडू एवढा गोळीगत केला की, अनेकांना डोळ्यावर विश्वासच बसेना, हा शॉट पाहून विराटला देखील आश्चर्य वाटलं. त्यावेळी त्याने सुर्यकुमारकडे पाहून भन्नाट रिकॅशन देखील दिली. त्यावेळी भारताच्या 135 धावा झाल्या होत्या. विराटच्या या शॉटनंतर दोघांनी बॅटिंगच्या गाडीचा घेर बदलला आणि अखेरच्या षटकात 17 धावा केल्या. यात विराट आणि सुर्याने 1-1 सिक्स खेचला होता.

Read More