Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला तरुण पुढे जे घडलं ते.....

कोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला 'जबरा फॅन', पण घडलं असं काही की.... पाहा व्हिडीओ 

कोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला तरुण पुढे जे घडलं ते.....

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात एका धक्कादायक प्रकार घडला. आयपीएल 2022 च्या एलिमिनेट सामन्यात जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. जगभरात कोहलीचे चाहते खूप आहेत. कोहलीला पाहण्यासाठी भेटण्यासाठी चाहते आतूर असतात. 

असाच एक कोहलीचा जबरदस्त फॅन लाईव्ह मॅच सुरू असताना मैदानात आला. मैदानात तो आल्याचं पाहून तातडीनं त्याला पोलिसांनी उचललं आणि मैदानाबाहेर घेऊन गेले. 

या माथेफिरू फॅन मॅच सुरू असताना मध्येच मैदानात उतरला आणि कोहलीच्या दिशेनं धावत निघाला. कोहली त्याच्यापासून वाचण्यासाठी तिथून दुसऱ्या जागी गेला. या फॅनला पोलिसांनी उचलून मैदानाबाहेर नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मैदानात लाईव्ह मॅच सुरू असताना जबरदस्ती मैदानात घुसण्यात आल्याचा आरोप या तरुणावर आहे. पोलिसांनी या प्रकरणी तरुणावर कारवाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Read More