Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबईच्या वानखेडे मैदानात नाटू-नाटू; Virat kohli वरही ऑस्कर विनर गाण्याचा फिव्हर

Virat kohli: विराट ज्या पद्धतीने डान्स करत होता, त्यानुसार तो नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. दरम्यान कोहलीचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली ऑन फिल्ड त्याच्या जॉली नेचरसाठी ओळखला जातो.

मुंबईच्या वानखेडे मैदानात नाटू-नाटू; Virat kohli वरही ऑस्कर विनर गाण्याचा फिव्हर

Virat kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वनडेचा सिरीजचा (IND vs AUS 1st ODI) पहिला सामना खेळवला गेला. टीम इंडियाने (Team India) प्रथम गोलंदाजी करून कांगारूंची दाणादाण उडवली. यावेळी टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजी करत असताना विराट कोहलीचा मैदानावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली डान्स मूव्ह्ज करतोय.

नाटू नाटू गाण्यावर विराट कोहलीचा ठेका

ऑस्ट्रेलियाची टीम जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरली त्यावेळी विराट कोहली फिल्डींगसाठी स्लिपमध्ये उभा होता. विराट कोहली ऑन फिल्ड त्याच्या जॉली नेचरसाठी ओळखला जातो. अशातच पहिल्या वनडे सामन्यात स्पिलमध्ये उभा असलेला विराट डान्स करताना कॅमेरात कैद झाला. 

विराट ज्या पद्धतीने डान्स करत होता, त्यानुसार तो नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. दरम्यान कोहलीचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

पहिल्या वनडेत विराट कोहली फेल

पहिल्या वनडे सामन्यात कांगारूंकडून टीम इंडियाला अवघ्या 189 रन्सचं आव्हान मिळालं. या लक्ष्याचा पाठलाग करणं टीम इंडियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांना कठीण गेलं. भारताने सुरुवातीचे काही विकेट्स फार स्वस्तात गमावले. यामध्ये आज विराट कोहलीला देखील चांगला खेळ करता आला नाही. टीमची अवस्था वाईट असताना कोहलीला डाव सांभाळता आला नाही. आजच्या सामन्यात 9 बॉल्समध्ये केवळ चार रन्स करून पव्हेलियनमध्ये परतला. 

फिल्डींगमध्ये विराटची कमाल

पहिल्या वनडे सामन्यात चाहत्यांना कोहलीच्या उत्तम फिल्डींगचा नजराणा पाहायला मिळाला. 11व्या ओव्हरमध्ये कोहलीने बॉल थांबवण्यासाठी शॉर्ट कव्हरपासून मिड-विकेटपर्यंत ज्या चपळतेने धाव घेतली त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. 

टीम इंडिया इलेव्हन 

शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबोट, मिचेल स्टार्क आणि एडम जांपा.

Read More