Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

द. आफ्रिकेच्या रस्त्यांवर नाचले विराट आणि शिखर, व्हिडीओ झाला व्हायरल

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. 

द. आफ्रिकेच्या रस्त्यांवर नाचले विराट आणि शिखर, व्हिडीओ झाला व्हायरल

केपटाऊन : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. 

दरम्यान, ५ जानेवारीपासून सुरु होत असलेल्या पहिल्या सामन्यात सलामीचा फलंदाज शिखर धवन खेळणार नाहीये. त्याच्या जागी मुरली विजय आणि लोकेश राहुल खेळू शकतात. 

दुसरीकडे विराट कोहलीही लग्नाच्या सुट्टीनंतर मैदानावर परततोय. विराट सुट्टीवर असताना त्याच्या जागी रोहित शर्माने नेतृत्व सांभाळले होते. टीम इंडिया सध्या द. आफ्रिकेत आहे. 

 

Guess who is up for Bhangra on the streets of Capetown!

A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on


 

शिखर आणि विराटचा द. आफ्रिकेतील एक व्हिडीओ समोर आलाय. यात विराटसह शिखर आफ्रिकेच्या रस्त्यावर नाचताना दिसतोय. या व्हिडीओला फॅन्सकडूनही चांगली पसंती मिळतेय.

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार),  मुरली विजय, केएल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (विकेट कीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह

भारतचा द. आफ्रिका दौरा –

टेस्ट मालिका :

पहिली टेस्ट, ५-९ जानेवरी: न्यूलँड्स, केपटाउन

दुसरी टेस्ट, १३ जानेवारी-१७ जानेवारी: सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन

तिसरी टेस्ट, २४ जानेवारी- २८जानेवारी: न्यू वॉन्ड्रर्स स्टेडियम, जोहेन्सबर्ग

वनडे सीरीज:

पहिली वनडे, १ फेब्रुवारी : किंग्समीड, डर्बन

दुसरी वनडे , 04 फेब्रुवारी: : सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन

तीसरा वनडे , 07 फेब्रुवारी: न्यूलँड्स, केपटाउन

चौथी वनडे , 10 फेब्रुवारी : न्यू वॉन्ड्रर्स स्टेडियम

पाचवी वनडे , 13 फेब्रुवारी: सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ

सहावी वनडे ,16 फेब्रुवारी: सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन

टी20 सीरीज:

पहिली टी20 , 18 फेब्रुवारी: न्यू वॉन्ड्रर्स स्टेडियम

दुसरी टी20 , 21 फेब्रुवारी: सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन

तिसरी टी20 , 24 फेब्रुवारी: न्यूलैंड्स, केपटाउन

Read More