Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

१५ जानेवारी आणि विराटच्या शतकांचं खास कनेक्शन

विराट कोहलीचं शतक आणि १५ जानेवारीचा योगायोग

१५ जानेवारी आणि विराटच्या शतकांचं खास कनेक्शन

एडिलेड : विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी वनडे जिंकली. एडिलेडमध्ये खेळला गेलेला दुसरा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. विराटने या सामन्यात ११२ बॉलमध्ये १०४ रनची इनिंग खेळली. विराटच्या या इनिंगमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. यानंतर धोनी आणि दिनेश कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकीय पार्टनरशिप केली. टीम इंडियाला ४ बॉल बाकी सोडत दोघांनी विजय मिळवून दिला. विराट कोहलीचं वनडे करिअरमधलं ३९ वं शतक ठरलं. ज्यापैकी ३२ वेळा त्याने भारताला विजय मिळवून दिला आहे. एडिलेडमध्ये शतकीय खेळी करणाऱ्या विराटने १५ जानेवारीला शतकांची हॅट्रीक केली.

विराटने १५ जानेवारी २०१९ ला कोणत्याही फॉरमॅटमध्ये वर्षातील पहिलं शतक ठोकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विराटने मागील ३ वर्षात ही कामगिरी केली आहे. ही गोष्ट २०१७ मध्ये सुरु झाली होती. पुण्यात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विराटने १०५ बॉलमध्ये १२२ रन केले होते. यानंतर १५ जानेवारी २०१८ ला दक्षिण आफ्रिके विरोधात सेंचुरियन टेस्टमध्ये २१७ बॉलमध्ये १५३ रनची खेळी केली होती. एडिलेडमध्ये शतक ठोकत तो आणखी एक पाऊल पुढे गेला. 

एडिलेडमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत ३ सामन्यांच्या सिरीजमध्ये १-१ ने बरोबरी केली आहे. सिरीजचा तीसरा आणि निर्णायक सामना मेलबर्नमध्ये १८ जानेवारीला होणार आहे.

Read More