Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सामन्याआधी विराटला चिअर करण्यासाठी बंगळुरुत पोहोचली अनुष्का, VIDEO व्हायरल

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची चर्चा सतत होत असते.

सामन्याआधी विराटला चिअर करण्यासाठी बंगळुरुत पोहोचली अनुष्का, VIDEO व्हायरल

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची चर्चा सतत होत असते. हे जोडपं सोशल मीडियावर मोठे सेलिब्रेटी कपल आहे. यांच्या प्रत्येक छोट्याछोट्या गोष्टी चर्चेत असतात. भारताचा कर्णधार आणि बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली पंजाबसोबतच्या सामन्यासाठी बंगळुरुमध्ये आहे. यावेळी अनुष्का शर्मा सुई-धागा आणि झिरो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र त्यातून वेळ काढून अनुष्का विराटला भेटण्यासाठी बंगळूरुला पोहोचलीये. बंगळुरुमधील विराट-अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायत. 

टी-२० स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर बंगळुरुचा आज सामना पंजाबविरुद्ध होतोय. बंगळुरूला पहिल्या सामन्यात कोलकात्याकडून पराभव सहन करावा लागला होता. 

 

@virat.kohli & @anushkasharma Spotted in Bangalore yesterday #viratkohli #anushkasharma #virushka

A post shared by Sara (@virushka_folyf) on

 

सामन्याआधी विराट आणि अनुष्काला एकत्र पाहिले देले. इन्स्टाग्रामवर विराट आणि अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायत. या दोघांच्या फॅन्सनी व्हिडीओ आणि फोटोज अपलोड केलेत. यात दोघेही एका रेस्टॉरंटमधून बाहेर निघताना दिसतायत.

अनुष्का आणि विराटने ११ डिसेंबर २०१७मध्ये इटलीमधील खाजगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर आता दोघेही आपापल्या कामांत बिझी आहेत. 

जिंकण्याच्या इराद्याने उतरणार बंगळूरु

कोलकाताविरुद्ध पराभव सहन करावा लागल्याने आता बंगळुरु पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजयाच्या इराद्याने उतरणार आहे. पहिल्या पराभवाने विराट अँड कंपनी निराश झाली असली तरी ही निराशा झटकून त्यांना गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. 

Read More