Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयच्या गावात! एका ओव्हरमध्ये ठोकल्या 46 धावा, प्रेक्षकांनीही डोक्याला लावला हात; पाहा VIDEO

Viral Video: एका फलंदाजाने एका ओव्हरमध्ये तब्बल 46 धावा ठोकल्या आहेत. T20 फलंदाजाने ही कामगिरी केली असून, व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.   

आयच्या गावात! एका ओव्हरमध्ये ठोकल्या 46 धावा, प्रेक्षकांनीही डोक्याला लावला हात; पाहा VIDEO

Viral Video: एका ओव्हरमध्ये फलंदाज जास्तीत जास्त किती धावा करु शकतो? हा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर साहजिकपणे 36 धावा असं उत्तर असेल. याचं कारण फलंदाजाने एका चेंडूवर एक षटकार या हिशोबाने सहा चेंडूवर सहा षटकार लगावले तर 36 धावाच होऊ शकतात. त्यातही जर त्याने एखादा व्हाइड किंवा नो बॉल टाकला तर या धावा अजून वाढू शकतात. पण एखाद्या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 46 धावा ठोकल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही ना...पण असं झालं आहे. त्यानंतरही जर तुमचा विश्वास बसत नसेल तर या सामन्यातील व्हिडीओही व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

एका ओव्हरमध्ये 36 धावा ठोकण्याचा विक्रम एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेळा झाला आहे. एकदा २००६ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सने आणि दुसऱ्या वेळी २०२१ मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्ध यूएसएच्या जसकरण मल्होत्राने हा रेकॉर्ड केला होता. कसोटीत भारताच्या जसप्रीत बुमराहने हा विक्रम केला आहे. 2022 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध एका षटकात 35 धावा कुटल्या होत्या. तर T20I मध्येही एका षटकात सर्वाधिक 36 धावा केल्याचा विक्रम दोनवेळा झाला आहे. 2007 मध्ये युवराज सिंगन इंग्लंडविरुद्ध आणि 2021 मध्ये किरॉन पोलार्डने श्रीलंकेविरोधात हा रेकॉर्ड केला होता. पण एका षटकात 46 धावा ठोकण्याचा अनोखा विक्रम फलंदाजाने केला आहे. 

कुवैत येथे पार पडलेल्या KCC Friends Mobile T20 Champions Trophy 2023 मधील सामन्यात हा रेकॉर्ड झाला आहे. NCM Investment आणि Tally CC यांच्यात हा सामना सुरु होता. यावेळी NCM च्या वासूने Tally च्या हरमनची चांगलीच धुलाई केली. 

हरमनने पहिलाच चेंडू नो-बॉल टाकला होता. वासूने त्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर त्याने चार बाइज धावा दिल्या. यानंतरच्या पाचही चेंडूवर त्याला सलग पाच षटकार ठोकण्यात आले. यामधील एक नो बॉल होता. शेवटच्या चेंडूवरही फलंदाजाने चौकार लगावला आणि एका ओव्हरमध्ये तब्बल 46 धावांचा विक्रम झाला. 

हा पाहा व्हिडीओ

आयपीएलमधील महागड्या षटकांबद्दल बोलायला गेल्या, लीगमध्ये एका षटकात दोनदा 37 धावा झाल्या आहेत. एका षटकात ठोकण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. 2011 मध्ये आरसीबीविरुद्धच्या सामन्यात कोची टस्कर्स केरळच्या पी. परमेश्वरनने 37 धावा दिल्या होत्या. 2021 मध्ये पुन्हा अशीच कामगिरी झाली होती. तेव्हा RCB च्या हर्षल पटेलने CSK विरुद्ध धावा केल्या होत्या.

Read More