Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी

टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....

अंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी

मुंबई : टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....

  • पंजबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील फजिल्का इथला हा खेळाडू. वय वर्षे फक्त १८. याने अंडर १९ विश्वचषकात ३७२ धावा केल्या. या धावा कर्णधार पृथ्वी शॉपेक्षाही अधिक आहेत.
  • आयपीएल निलावात शूभमानवर जोरदार पैसे खर्च करण्यात आले. कोलकाता नाईटराईडर्सने त्याला १.८ कोटी रूपयांची बोली लावली.
  • अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तनाविरोधात शुभमान गिलने नाबाद राहात संघाला विजय मिळवून देणारी शतकी खेळी केली. 
  • यूथ वनेडेमध्ये शुभमाना गिलने १४ सामन्यांमध्ये १४ डावांत आतापर्यंत १११४ धावा ठोकल्या आहेत. २०१६ ते १८ या कालवधीतील त्याची ही कामगिरी आहे. ४ शतके आणि ६ अर्धशतकेही त्याच्या नावावर आहेत. 
  • आपल्या खेळाला सतत प्राधान्य देणारा शुभमान आपल्या तंदुरूस्थिकडेही चांगलेच लक्ष देतो. त्यासाठी त्याने दोन वर्षे झाली अहारात मिठाचे सेवन केले नाही. तंदुरूस्थिवर बारीक ध्यान असलेला शुभमान श्रद्धाळूही आहे. कदाचित त्याचमुळे की काय पण, मैदानावर असताना शुभमान सतत आपल्यासोबत कमरेला एक लाल रूमाल ठेवतो.  
Read More