Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान

भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान ठेवलेय.

पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान

ख्राईस्टचर्च : भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान ठेवलेय.

भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मनोज कार्ला यांनी चांगली भागीदारी केली. शॉने ४१ धावा केल्या तर कार्लाने ४७ धावांची खेळी केली. 

शुभम गिलने ९४ बॉल खेळताना नाबाद १०२ धावा केल्या. यात त्याच्या ७ चौकारांचा समावेश आहे. 

पाकिस्तानकडून मुहम्मद मुसा याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर अर्शद इक्बालला ३ विकेट मिळवण्यात यश मिळाले. 

Read More