Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रैना, युवराजला वनडे संघात स्थान न मिळाल्याने फॅन्स भडकले

भारतीय संघ २७ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सहा वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. 

रैना, युवराजला वनडे संघात स्थान न मिळाल्याने फॅन्स भडकले

मुंबई : भारतीय संघ २७ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सहा वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. 

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन संघाची घोषणा केली. या वनडे संघात पुन्हा एकदा युवराज सिंग, सुरेश रैना, रविंचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना स्थान देण्यात आलेले नाहीये. विशेष म्हणजे यावेळी युवराज आणि रैना यांनी योयो टेस्ट पास केली होती. त्यामुळे त्यांना संघात स्थान मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती मात्र दोघांनाही संघातून वगळण्यात आलंय.

संघात कर्णधार कोहलीसह शार्दूल ठाकूरचे पुनरागमन होतेय. हैराण करणारी गोष्ट म्हणजे सध्या फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर लोकेश राहुलही संघात नाहीये. 

 

आफ्रिका दौऱ्यासाठी झालेल्या संघ निवडीवरुन सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

Read More