Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या भारताच्या 'या' खेळाडूने घेतलं दर्शन, म्हणाला 'जय माता दी'

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूचा दर्शन घेतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या भारताच्या 'या' खेळाडूने घेतलं दर्शन, म्हणाला 'जय माता दी'

Keshav Maharaj Navratri Wishes : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर असून Ind आणि Sa मध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20  सामने खेळवण्यात येणार आहेत. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Trending photo south africa player keshav maharaj viral photo visit padnam swami mandir)

व्हायरल होत असलेला खेळाडू हा केशव महाराज आहे. (Keshav Maharaj Navratri Wishes) या फोटोमध्ये केशव महाराज हा भारतीय पारंपारिक पोशाखात दिसत आहे. त्यांने तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) पद्मानंद स्वामी मंदिरात पूजा केली. यादरम्यानचा केशव महाराजने फोटो शेअर केला असून आणि कॅप्शनमध्ये, 'जय माता दी' असं म्हटलं आहे. (Keshav Maharaj jai Mata Di)

केशव महाराज हा मूळचा भारतामधील उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचा आहे. आफ्रिकेत राहूनही तो हिंदू रितीरिवाजांचे पालन करत असून तो हनुमानाचा मोठा भक्त आहे. केशव महाराजांचे पूर्वज 1874 मध्ये भारतातून डर्बनमध्ये नोकरीच्या शोधात गेले होते आणि त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले.

केशव महाराजचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. केशव महाराजचे वडीलही दक्षिण आफ्रिकेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे. 

टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दीपक हुडा (Deepak Hudda) आणि मोहम्मद शमी (Mohameed Shmai) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. पहिला टी20 सामना - 28  सप्टेंबर, दुसरी टी20 मॅच - 2 ऑक्टोंबर, तिसरी टी20 - 4 ऑक्टोंबर तर वनडे सीरिज ही 6 तारखेपासून सुरू होणार आहे. पहिला वनडे- 6 ऑक्टोंबर, दुसरा वनडे - 9 ऑक्टोंबर आणि तिसरा वनडे- 11 ऑक्टोंबर

Read More