Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अवनी चालू शकत नाही, पण ''गोल्ड मेडल''च्या खडतर प्रवासात ती जिंकली

आज अवनी आयुष्याच्या ज्या उंचीवर पोहोचली आहे. त्यामागे तिच्या वडिलांचा मोठा हात आहे.

अवनी चालू शकत नाही, पण ''गोल्ड मेडल''च्या खडतर प्रवासात ती जिंकली

मुंबई : टोकियो पॅरालिम्पिक 2020 (Tokyo Paralympics 2020) मध्ये भारताला अवनी लेखराने नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 19 वर्षीय अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या वर्ग एसएच 1 मध्ये प्रथम स्थान मिळवले. अवनीने नोव्हेंबर 2019 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला टोकियोमध्ये पदक मिळवायचे आहे.

आज अवनी आयुष्याच्या ज्या उंचीवर पोहोचली आहे. त्यामागे तिच्या वडिलांचा मोठा हात आहे. 8 नोव्हेंबर 2001 रोजी जयपूर, राजस्थानमध्ये जन्मलेल्या, 2012 मध्ये अवनीचे आयुष्य संपूर्ण बदलले. 

जेव्हा अवनी 11 वर्षांची होता, तेव्हा तिचा कार अपघात झाला होता, ज्यात तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर स्पायनल कॉर्डच्या आजाराने ती त्रस्त झाल्याने ती कायम व्हीलचेअरवर आली. मात्र, तिने कधीही याला आपली कमजोरी बनू दिली नाही. तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि कायद्याचे शिक्षण घेतले.

अवनीच्या वडिलांची इच्छा होती की, तिने खेळावरही लक्ष केंद्रित करावे. तिच्या वडिलांनी तिला सांगितले की, शूटिंग आणि तिरंदाजी दोन्ही करून पाहा आणि नंतर एक निवड. अवनीने एका मुलाखतीत सांगितले होते, "2015 मध्ये, माझ्या वडिलांनी शूटिंग आणि तिरंदाजी दोन्ही करायला सांगितले आणि मी दोन्ही प्रयत्न केले. प्रथमच रायफल पकडल्यानंतर मला शूटिंगमध्ये अधिक जास्त रस असल्याचे वाटले."

अवनीने हे ही सांगितले की अभिनव बिंद्रा हे देखील तिने शूटिंग निवडण्याचे एक कारण आहे. तिने अभिनव बिंद्राचे चरित्र 'ए शॉट अॅट हिस्ट्री' वाचले. त्यानंतर ती शूटिंगसाठी अधिक गंभीर झाली.

त्यानेतर 2015 पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला. जयपूरमधील जगतपूरा क्रीडा संकुलात अवनी शूटिंगचा सराव करत होती. त्यानंतर तिने राजस्थान टेस्ट चॅम्पीयनमध्ये भाग घेतला आणि तिने तिचे पहिले पदक जिंकले. ही टेस्ट  चॅम्पीयनशिप खेळण्यासाठी तिने तिच्या कोचकडून रायफल उधार घेतली होती.

काही महिन्यांनंतर अवनीने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि ब्रॉंझ पदक जिंकले. 2016 ते 2020 दरम्यान अवनीने नॅशनल नेमबाजी स्पर्धेत 5 वेळा सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी यूएईमध्ये पार पडलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अवनी ने सिल्व्हर पदक पटकावले.

fallbacks

वडील म्हणाले - हृदयाचे ठोके वाढले

अवनीचे वडील प्रवीण लेखरा हे श्रीगंगानगर, राजस्थान येथे तैनात आहेत. ते महसूल विभागात RAS अधिकारी आहेत. त्यामुळे अवनीची आई आता अवनीसोबत टोकियोमध्ये आहे.

अवनीच्या या खेळाबद्दल बोलताना अवनीचे वडील म्हणाले की, 'हे तिच्या मेहनतीचे हे फळ आहे. तिचा जेव्हा टोक्योमध्ये खेळ सुरू होता, तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि अंगावर काटा उभा राहिला होता.'

Read More