Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Tokyo Olympics 2020: मेडलपेक्षाही खास आहे हा बुके, त्यामागची गोष्ट माहितीय का?

कोणती फुलं आणि त्यामागचं असलेलं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का

Tokyo Olympics 2020: मेडलपेक्षाही खास आहे हा बुके, त्यामागची गोष्ट माहितीय का?

मुंबई : कोणत्याही क्रिडापटूसाठी, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे ही एक मोठी गोष्ट असते. ऑलिम्पिकमधून मिळालेली कौतुकाची थाप अत्यंत महत्वाची असते. या यशानंतर त्या क्रिडापटूसह अनेकांच मनोबल वाढतं. भविष्यात त्या खेळाकडे आणि क्रिडापटूकडे अभिमानाने पाहिलं जातं. ( Tokyo Olympics: The medal winners' flowers that pay tribute to 2011 disaster) 

fallbacks

चालू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये, अनेक खेळाडूंनी आपापल्या देशांना आदर आणि पदक मिळवून विजय मिळवून दिला आहे. सर्वांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांच महत्व माहितच आहे. पण या पदकांसोबत विजेत्यांना मिळणाऱ्या फुलांच्या पुष्पगुच्छाचे महत्त्व अनेकांना माहित नाही. 

fallbacks

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रिडापटूंमध्ये 5,000 हून अधिक पुष्पगुच्छ क्रिडापटूंना दिले जात आहेत. हे बुके 2011 च्या भूकंप आणि त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या ईशान्य जपानच्या तीन जिल्ह्यांमधील फुलांपासून तयार करण्यात आले आहेत. २०११ मध्ये इवाटे, फुकुशिमा आणि मियाग या तीन जिल्ह्यांमध्ये २०,००० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आणि ही क्षेत्रे अजूनही या प्रभावातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पुष्पगुच्छांमधील सूर्यफूल मियागीमधून घेतले जातात.

fallbacks

दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिम्पिक गेम्स गेल्या वर्षी होणार होते. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आले. या वर्षी, त्यांनी एका गोंधळलेल्या जगाला हसण्याचे कारण देत आहे. जपानमधील दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांसाठी एक  ती श्रद्धांजली म्हणून अर्पण केली आहे. पण जगासाठी ती गोष्ट कायम आठवण म्हणून राहिल.

fallbacks

पदकविजेत्यांना देण्यात येणारे पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या फुलांचे पुष्पगुच्छ वेगळे आहेत. जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक ठरलेल्याला लक्षात ठेवण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे. 

fallbacks

 

Read More