Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asian Games 2023: टीम इंडियाची जर्सी परिधान करताच भावूक झाला खेळाडू; राष्ट्रगीतावेळी डोळे पाणावले...

IND vs NEP Quarter Final: एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला.

Asian Games 2023: टीम इंडियाची जर्सी परिधान करताच भावूक झाला खेळाडू; राष्ट्रगीतावेळी डोळे पाणावले...

IND vs NEP Quarter Final: चीनमध्ये सध्या एशियन गेम्स खेळवले जात असून यंदा पुरुषांच्या क्रिकेट टीमचाही यामध्ये समावेश झाला आहे. 3 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध नेपाळ यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने नेपाळचा पराभव केला आहे. या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंची टीम पाठवण्यात आली आहे. या टीममध्ये साई किशोरचा देखील समावेश करण्यात आलाय. दरम्यान नेपाळविरूद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी टीम साई किशोरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.  

एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला. नेपाळच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. साई किशोरचा भावुक झाल्याचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

या सामन्यात भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि नेपाळ यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना हांगझोऊच्या पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. साई किशोरशिवाय विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मानेही या सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. 

गुजरात टायटन्सकडून खेळतो साई किशोर

आयपीएलच्या गुजरात टायटन्स टीमकडून साई किशोर खेळतो. आतापर्यंत त्याने या टीमकडून 5 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना 6 विकेट्स घेतल्या आहेत. 

टीम इंडियाचा विजय

एशियन गेम्स 2023 च्या क्वार्टर फायनल सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 23 रन्सने पराभव केला. यासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीये. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 202 रन्स केले होते. टीम इंडियाने नेपाळसमोर विजयासाठी 203 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळच्या टीमला केवळ 179 रन्स केले आहेत.

टीम इंडियाची प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.

Read More