Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'हा' भारतीय मोडेल माझा 400 धावांचा विक्रम, एका डावात करेल 501* धावा; लाराचा दावा

Brian Lara Says Indian Cricketer Will Score 400 Runs: एका विशेष मुलाखतीमध्ये बोलताना ब्रायन लाराने भारतीय क्रिकेटपटूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तो सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं लारा म्हणालाय.

'हा' भारतीय मोडेल माझा 400 धावांचा विक्रम, एका डावात करेल 501* धावा; लाराचा दावा

Brian Lara Says Indian Cricketer Will Score 400 Runs: विक्रम हे मोडण्यासाठीच असतात असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. मात्र काही विक्रम मोडणं हे फारच कठीण आहे ही गोष्टही खरीच आहे. सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम असेल किंवा मुथय्या मुरलीधरनचा 800 कसोटी विकेट्सचा विक्रम असेल अथवा ब्रायन लाराचा कसोटीमधील सर्वाधिक म्हणजेच वैयक्तिक 400 धावांचा विक्रम मोडणे अशक्यच आहे. असं असलं तरी ब्रायन लाराला स्वत:ला कसोटी क्रिकेटमधील त्याचा नाबाद 400 धावांचा विक्रम मोडला जाईल असं वाटतं आहे. ब्रायन लाराने स्वत: याबद्दल भाष्य करताना कोणता फलंदाज हा विक्रम मोडू शकतो त्याचं नावही घेतलं आहे.

लाराचे अनोखे विक्रम

भारतीय संघातील स्फोटक सलमीवीर शुभमन गिल हा कसोटीमधील एका डावामध्ये नाबाद 400 धावांपेक्षा अधिक धावा करु शकतो असं ब्रायन लाराने म्हटलं आहे. कसोटीमध्ये 400 धावांपर्यंत पोहोचणारा ब्रायन लारा हा जगातील पहिला आणि आजच्या तारखेपर्यंत एकमेव क्रिकेटपटू आहे. लाराने 2004 साली इंग्लंडमधील कसोटीमध्ये एकाच डावात नाबाद 400 धावा केलेल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात एकाच खेळाडूने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही लाराच्या नावावरच आहे. लाराने 1994 साली कंट्री चॅम्पियन सामन्यामध्ये नाबाद 501 धावांची खेळी केली होती. 

सध्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

आपले हे दोन्ही विक्रम शुभमन गिल मोडू शकतो असं ब्रायन लाराने 'आनंदबाझार पत्रिका'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये शुभमन गिल हा सर्वात टॅलेंटेड क्रिकेटपटू असल्याचं लाराने म्हटलं आहे. "सध्याच्या पिढीमध्ये शुभमन गिल हा सर्वोत्तम फलंदाज आहे. पुढील काही वर्षांमध्ये तो क्रिकेट विश्वावर राज्य करेल. मला वाटतं की तो अनेक मोठे विक्रम मोडीत काढेल," असं लाराने म्हटलं आहे. "माझे दोन्ही विक्रम (कसोटीत 400 आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद 501 धावांचा विक्रम) शुभमन मोडेल," असं लाराने म्हटलं आहे.

कसोटीत चमक दाखवता आली नाही

शुभमन कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 मध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा क्रिकेटपटू आहे. तसेच सर्वात कमी वयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रमही शुभमनच्या नावे आहेत. कसोटीमध्ये शुभमनला अद्याप चमक दाखवता आलेली नाही. त्याने 18 कसोटी सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने एका शतकाच्या जोरावर 966 धावा केल्यात. मात्र तो केवळ 24 वर्षाचा असून अजून बरेच क्रिकेट तो खेळणार आहे. "तो माझे विक्रम मोडू शकतो," असं लारा म्हणाला आहे. 

आयसीसी स्पर्धा गाजवेल

गिल हा भविष्यात आयसीसीच्या ट्रॉफी भारताला जिंकून देईल असा विश्वासही गिलने व्यक्त केला आहे. "गिलने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावलेलं नाही. मात्र त्याने यापूर्वी खेळलेल्या खेळी पाहिल्यास त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये शतक झळकावली आहेत. त्याने आयपीएलमध्येही अनेक विजय मिळवून देणाऱ्या खेळी खेळल्यात. तो आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भविष्यात अशा खेळी करेल असा मला विश्वास वाटतोय," असं लाराने म्हटलं आहे.

लिहून ठेवा

"गिल कंट्री क्रिकेट खेळला तर तो माझा नाबाद 501 चा विक्रम नक्की मोडेल. कसोटी क्रिकेटमध्ये तो नक्कीच एका डावात वैयक्तिक 400 धावांचा टप्पा ओलांडेल. क्रिकेटमध्ये फार बदल झाला आहे. खास करुन फलंदाजीमध्ये तर फारच. जगभरातील टी-20 लीगमध्ये फलंदाज खेळतात. आयपीएलने सारं काही बदलललं आहे. धावांचा वेग वाढला आहे. त्यामुळे एवढ्या अधिक धावा करता येणं शक्य आहे. शुभमन नक्कीच हे करुन दाखवेल. तुम्ही हवं तर माझे शब्द लिहून ठेवा," असं लारा म्हणाला.

Read More