Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रॉजर फेडररची मुलं पॉकेटमनीसाठी करतात 'ही' कामं

  रॉजर फेडरर.... 20 ग्रँडस्लॅम स्वतःच्या नावे करणारा विजेता...

रॉजर फेडररची मुलं पॉकेटमनीसाठी करतात 'ही' कामं

मुंबई :  रॉजर फेडरर.... 20 ग्रँडस्लॅम स्वतःच्या नावे करणारा विजेता...

फेडररने आतापर्यंत अनेक यशाची शिखरे आपल्या नावे केली. आतापर्यंत सामन्यांमधून असंख्य रुपये कमावले असतील. वेगवेगळी स्पॉनसरशिप त्याला मिळाली असेल. मिळालेल्या माहितीनुसार 2017 पर्यंत त्यांच्याकडे 64 मिलियन डॉलर रक्कम जमा केली. एवढा श्रीमंत असलेल्या रॉजर फेडररची मुलं मात्र करतात 'हे' काम. 

फेडररकडे आहे एवढी संपत्ती 

फेडररच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत. तसेच सर्वात श्रीमंत असा खेळाडू म्हणून फेडररकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे 2017 फोबर्सच्या यादीत चौथ्या क्रमांकावर या श्रीमंत खेळाडूचं नाव आहे. असं असलं तरीही या श्रीमंत खेळाडूची मुलं मात्र पॉकेटमनीसाठी काम करतात ही गोष्ट फेडररच्या चाहत्यांना धक्का देणारी आहे. 

पॉकेटमनीसाठी मुलं करतात ही कामं

फेडररला मायला आणि शार्लिन या दोन जुळ्या मुली आहेत, तर लिओ व लेनी हे दोन जुळे मुलगे आहेत. या चार जणांनी मिळून आपल्याला काही पैसे कमावण्यासाठी लिंबू पाणी विकण्याचा उद्योग सुरु केलाआहे. दस्तुरखुद्द फेडररनेही या गोष्टीचा खुलासा केला आहे. आपल्या मुलांच्या ' उद्योग 'बद्दल फेडरर म्हणाला की, " माझी चारही मुलं पॉकेटमनी मिळवण्यासाठी लिंबूपाणी विकण्याचे काम करत आहेत. लिंबूपाणी विकून त्यांनी एका दिवसात 70 डॉलर एवढी कमाईही केली आहे. मी स्पर्धेत व्यस्त आहे, नाहीतर मी देखील त्यांना मदत केली असती, असं फेडरर म्हणाला आहे. 

Read More