Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

120 तासांत काय होतं ते जग बघेल! गौतम गंभीरच्या 'मनमानी'नंतर विराट कोहलीची मोठी स्ट्रॅटर्जी

T20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने ब्रेक घेतल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे संघात तो खेळणार की नाही, असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांचं नाव यादी जाहीर झालं. विराट कोहलीकडे श्रीलंकेत वर्चस्व गाजवण्याची तीन कारणं सांगण्यात येत आहेत. 

120 तासांत काय होतं ते जग बघेल! गौतम गंभीरच्या 'मनमानी'नंतर विराट कोहलीची मोठी स्ट्रॅटर्जी

T20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणासाठी ब्रेक घातला होता. पण भारतीय क्रिकेट संघाचा नवनिर्वाचित हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचा नेतृत्त्वात श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka tour) जाणार आहे. या दौऱ्यासाठी गौतम गंभीरने टीमची (India vs Sri Lanka) घोषणा केली. त्यात केकेआरकडून कधी ना कधी खेळले 6 खेळाडूंची निवड करण्यात आल्याचा पाहिला मिळत आहे. हे 6 खेळाडू गंभीरच्या कर्णधारपदाखाली केकेआरकडून खेळले तर काही त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेले आहेत. ही गौतम गंभीरची मनमानी म्हटली जात असताना विराट कोहली संघातून खेळणार की नाही यावर प्रश्न निर्माण झाला होता. पण संघाची यादी जाहीर झाली त्यात विराटच नावही आहे. गंभीरच्या या मनमानीनंतर आता विराट कोहलीनेही मोठी तयारी केलीय. विराटच्या या तयारीचा परिणाम श्रीलंका दौऱ्यासाठी स्ट्रॅटर्जी ठरवली आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विराट कोहली श्रीलंका दौऱ्यावर काय करणार आहे? खरं तर विराट कोहली काय करणार आहे याचा थेट संबंध त्याच्या आकडेवारीशी आहे. अशा काही कामगिरी आहे जी श्रीलंकेच्या मैदानात कोहली इतिहास करण्याचा तयारीत आहे. 

श्रीलंकेत विराट कोहलीच्या 'या' 3 कामगिरी!

विराट कोहलीशी संबंधित 3 आकडेवारीपैकी एक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या धावांशी संबंधित आहे. दुसरा आकडा विराटच्या आंतरराष्ट्रीय धावांशी संबंधित असून तिसरा आकडा श्रीलंकेच्या भूमीवर 1000 धावांचा आहे. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील 14000 धावांपासून 152 धावा दूर आहे. त्याचवेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 27000 धावांपासून 116 धावा दूर आहे. याशिवाय श्रीलंकेत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 135 धावांची गरज असणार आहे. श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केल्यास या तीन इतिहास तो रचणार आहे. 

टीम इंडियाला 2 ऑगस्टपासून श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे खेळणार आहेत. या मालिकेतील शेवटची वनडे 7 ऑगस्टला होणार आहे. तिन्ही एकदिवसीय सामने 5 दिवसात म्हणजेच 120 तासांत खेळवले जाणार आहेत. या 120 तासात विराट कोहली काय करतो हे जगाला पाहायला मिळणार आहे. त्याची बॅट चालली तर तिन्ही कामगिरी तो श्रीलंकेच्या मैदानात आपल्या नावावर करणार आहे. पण त्याची बॅटची जादू चालली नाही तर विराटला प्रतीक्षा करावा लागणार आहे. 

विराट कोहलीने आतापर्यंत श्रीलंकेत 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.88 च्या सरासरीने 865 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 शतकं झळकावली आहेत. विराटच्या एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 292 सामन्यांमध्ये 50 शतकांसह 13848 धावा केल्या आहेत.

Read More