Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वादावर माजी खेळाडू म्हणतो...

कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वादावर माजी खेळाडू म्हणतो...

मुंबई : कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. विराटकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं एक विधान समोर आलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, बोर्ड आणि सिलेक्टर्सने त्यांना टी-20 कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती परंतु विराट कोहलीने हे मान्य केलं नाही.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सौरव गांगुलीच्या विरोधात जाऊन सांगितले की, त्याला टी-20चे कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखलं नाही आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडण्यापासून रोखले नाही. निर्णय घेण्यापूर्वी केवळ दीड तास आधी सांगण्यात आलं.
 
दरम्यान आता माजी भारतीय लेग-स्पिनर अमित मिश्राने या संपूर्ण वादाबद्दल खेद व्यक्त केलाय. अमित मिश्राच्या म्हणण्याप्रमाणे की, हा संपूर्ण भाग अधिक पारदर्शक पद्धतीने हाताळता आला असता. विराट कोहलीच्या वक्तव्यानंतर अमित मिश्रांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

अमित मिश्राने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाचे वृत्तही फेटाळून लावलं. मिश्रा म्हणाला, "हे अजिबात सत्य नाही, दोन्ही खेळाडूंचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि दोन्ही खेळाडू मैदानावर त्यांचे 100% देण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर खूप चांगले संभाषण होतं"

अमित मिश्रा म्हणाला की, आतापर्यंत विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती, आता कर्णधार म्हणून स्वत:ला स्थापित करण्याची वेळ रोहितची आहे.

विराट कोहलीने एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्याच्या खूप अगोदरपासून विराट आणि रोहित शर्मा यांच्यात वेळोवेळी वाद झाल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान विराट कोहलीने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, मी या प्रश्नाचे उत्तर देऊन थकलो आहे आणि यात तथ्य नाही.

Read More