Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ravindra Jadeja Injury: रवींद्र जाडेजा T20 World Cup मधून बाहेर, Team India ला मोठा झटका

Ravindra Jadeja Injury :  टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे.    

Ravindra Jadeja Injury: रवींद्र जाडेजा T20 World Cup मधून बाहेर, Team India ला मोठा झटका

मुंबई : टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे. स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) त्याची दुखापत चांगलीच महागात पडली आहे. जाडेजा आशिया कपनंतपर (Asia Cup 2022) आता टी 20 वर्ल्ड कप 2022 मधूनही (T20I World Cup 2022) बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे. जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. जाडेजाला सरावादरम्यान ही दुखापत झाली होती.  (team india star allorunder ravindra jadeja upcoming t20i world cup 2022 after asia cup undergo knee surgery)  

जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी जाडेजाला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे जाडेजाला कमबॅकसाठी अनेक दिवस लागू शकतात, अशी माहिती पीटीआयने बीसीसीआयच्या हवाल्याने दिली आहे.

आशिया कपमधील कामगिरी 

जाडेजा आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्ध खेळला होता. जाडेजाने पाकिस्तान विरुद्ध 35 धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर हाँगकाँग विरुद्ध 1 विकेट घेतली होती. जाडेजा आशिया कपमधून बाहेर झाल्याने त्याच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला.   

Read More