Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएलनंतर आता भारतीय संघातूनही वगळलं, Team India चा 'हा' खेळाडू निवृत्तीची घोषणा करणार?

आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत टी20 सामने खेळणार आहे. 

आयपीएलनंतर आता भारतीय संघातूनही वगळलं, Team India चा 'हा' खेळाडू निवृत्तीची घोषणा करणार?

मुंबई :आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत टी20 सामने खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे  अनेक खेळाडूंना संघाबाहेर बसावे लागले आहे. त्यात हा खेळाडू तब्बल वर्षभरापासून संघात नसल्याने तो निवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.  

 खराब फॉर्मचा करतोय सामना 
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला भारतीय संघात पुन्हा संधी मिळणे कठीण झालेय. इशांतने नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच त्याचा शेवटचा आयपीएल सामना देखील मे 2021 रोजी खेळला होता. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे इशांत शर्माला टीम इंडियातून वगळण्यात आले आणि आयपीएल 2022 मध्येही कोणत्याही संघाने या खेळाडूला विकत घेतले नाही.

IPL 2022 मध्येही संधी नाही
 2022 च्या आयपीएल लिलावात इशांत शर्माला निवडले गेले नाही, ज्यामुळे त्याच्या आयपीएल कारकीर्दीला स्थगिती मिळाली. गेल्या काही हंगामात दिल्लीत जन्मलेला वेगवान दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र, दिल्लीनेही त्याला खरेदी केले नाही.  

कसोटी सामन्यातूनही वगळलं 
जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही इशांत शर्माला वगळलेय. त्यामुळे आयपीएलनंतर आता या मोठ्या सामन्यात त्याला संधी दिली नाही आहे. इंग्लंड विरुद्धचा हा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील गेल्या वर्षी अपूर्ण राहिलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता.

शेवटचा सामना
इशांत शर्मा शेवटचा नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत दिसला होता. त्या सामन्यात इशांत शर्माला एकही विकेट मिळवता आली नाही. खराब फॉर्म आणि फिटनेसशी तो सध्या झूंजतोय. त्यात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू उत्कृष्ट परफॉर्मन्स करत आपलं स्थान पक्क करत आहेत. आणि इशांत आपलं स्थान पक्क करण्यात अपयशी ठरतो. टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मासाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. त्यामुळे तो निवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. 

Read More