Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rishabh Pant: या सुंदर तरुणीमुळे उर्वशी रौतेला हिचा पत्ता कट, ऋषभ पंत याची स्वप्न परी पाहा कोण?

Rishabh Pant: टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषभ पंतचे नाव यापूर्वी उर्वशी रौतेला हिच्यासोबत जोडले जात होते. पण ..

Rishabh Pant: या सुंदर तरुणीमुळे उर्वशी रौतेला हिचा पत्ता कट, ऋषभ पंत याची स्वप्न परी पाहा कोण?

मुंबई : Rishabh Pant: टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषभ पंतचे नाव यापूर्वी उर्वशी रौतेला हिच्यासोबत जोडले जात होते. पण पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर पंत याने जाहीरपणे इंटिरियर डिझायनर ईशा नेगी (Isha Negi) हिच्यासोबत आपले प्रेम व्यक्त केले. 

fallbacks

ऋषभ पंत (Rishabh Pant) याची मैत्रीण इशान नेगी आहे. ईशा मूळची डेहराडूनची असून ती व्यवसायाने एक व्यापारी आणि इंटिरियर डिझायनर  (Interior Designer) आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. 

fallbacks

ईशा नेगी (Isha Negi) इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. तिचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहून ती कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही, असे वाटते.

fallbacks 

ईशा नेगी (Isha Negi) हिने तिचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील जीसस अ‍ॅण्ड मेरीकडून आणि कॉलेजचे शिक्षण नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून केले. ती ऋषभ पंत याच्या सोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. 2020 च्या सुरुवातीला ऋषभ पंत याने सोशल मीडियावर ईशा नेगी हिच्या सोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हा पंत याने खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले होते.

fallbacks

2019 मध्ये, ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला जुहू येथील एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा डिनर डेटवर जाताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. पण त्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या आणि पंत हिने उर्वशीला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले. अलीकडेच या पंत आणि उर्वशीमध्ये सोशल मीडियावर वादही झाला होता. आता ईशा नेगी पंत यांची मैत्रीण आहे. 

fallbacks

ऋषभ पंत सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर वन विकेटकीपर बॅट्समन आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने एकट्याच्या जोरावर जिंकले आहेत. पंतने भारतासाठी 31 कसोटी सामने, 27 एकदिवसीय सामने आणि 54 टी-20 सामने खेळले आहेत. 

Read More