Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'आता भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा', शोएब अख्तरची इच्छा; म्हणाला, 'डिप्रेशनचं...'

Shoaib Akhtar On India In T20 World Cup: शोएब अख्तरने भारतीय संघाबद्दल बोलताना 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पराभावाचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच त्याने रोहितचाही उल्लेख केला आहे.

'आता भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा', शोएब अख्तरची इच्छा; म्हणाला, 'डिप्रेशनचं...'

Shoaib Akhtar On India In T20 World Cup: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतच टी-20 वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. जे संघ सेमी-फायनलमध्ये पोहचले आहेत त्यांच्यापैकी आपला पाठिंबा भारताला असल्याचं शोएबनं जाहीर केलं आहे. भारताने सोमवारी 24 जून 2023 रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत करुन सेमी-फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. सेंट ल्युसिका येथील डेरेन सॅमी राष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सुपर 8 फेरीतील आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने 24 धावांनी जिंकला. भारताचा पुढील सामना 27 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

भारत जिंकेल असा विश्वास

भारतीय संघाचं कौतुक करताना शोएब अख्तरने 2023 मध्ये झालेला एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप भारतानेच जिंकायला हवं होता. ते यासाठी पूर्णपणे पात्र होते, असंही म्हटलं आहे. मात्र तेव्हा भारताची संधी हुकली असली तरी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू टी-20 चा वर्ल्ड कप नक्कीच जिंकेल असा विश्वास शोएबने व्यक्त केला आहे. भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर वर्ल्ड कप पुन्हा भारतीय उपखंडात आल्याचा आपल्याला आनंदच होईल असंही शोएबने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं

तुम्ही 100% पात्र आहात

"भारतीय संघाचं अभिनंदन त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. आता तुम्ही ही स्पर्धा जिंकली पाहिजे आणि वर्ल्ड कप भारतीय उपखंडातच राहिला पाहिजे. खरं तर तुम्ही आधीचा वर्ल्ड कपही जिंकला पाहिजे होता आणि आता हा सुद्धा जिंकला पाहिजे. खरोखरचं तुम्ही हा चषक जिंकण्यासाठी 100 टक्के पात्र आहात. माझा पाठिंबा तुम्हालाच आहे," असं शोएब म्हणाला.

नक्की वाचा >> रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'

रोहितचे विचार फार स्पष्ट

"रोहितचा दृष्टीकोन उत्तम आहे. त्याच्या डोक्यातील विचार अगदी स्पष्ट आहेत. तो खरोखरच चषक जिंकण्यासाठी पात्र आहे," असं शोएब म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधाराने 41 बॉलमध्ये 92 धावांची तुफानी खेळी केली. अवघ्या 8 धावांनी त्याचं शतक हुकलं. रोहितने त्याच्या तुफान खेळीमध्ये 7 चौकार आणि 8 षटकार लगावले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा रोहित हा पाहिला भारतीय कर्णधार ठरला. 

नक्की वाचा >> बाबरच काय युवराजलाही धोबीपछाड... Hitman रोहितने 92 रन्स करत मोडले 'हे' 10 मोठे विक्रम

भारताच्या विजयाने फार आनंद झाला

एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात उत्तम कामगिरी करण्याचा निश्चिय भारताने केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ शरण आल्याचं पाहून मला फार आनंद झाला, असं शोएब अख्तर म्हणाले.

नक्की वाचा >> पाकिस्तानच्या मानगुटीवर 'त्या' 60 रुम्सचं भूत... अमेरिका दौरा आता भलत्याच कारणाने चर्चेत

ऑस्ट्रेलिया दणका दिला

"भारताने फारच उत्तम विजय मिळवला. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघ दाबावामध्ये होता. त्यांनी तो वर्ल्ड कप जिंकायला हवा होता. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना पराभूत झाले होते. त्यांनी त्यांच्या तणावाचं (डिप्रेशनचं) ध्येयामध्ये रुपांतर केलं आणि त्यांनी ऑस्ट्रेलिया दणका दिला," असं शोएब म्हणाला.

Read More