Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर? सुपर 8 मध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

T20 World Cup Points Table 2024: भारत आणि युएसएकडून पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तान सुपर 8 मधून जवळजवळ बाहेर पडला आहे. पाकिस्तानसाठी (Pakistan Qualification Scenario) आगामी रणनिती कसे असेल? पाहा

पाकिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर? सुपर 8 मध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

T20 World Cup 2024, Super 8 Qualification Scenario: पाकिस्तानविरुद्धच्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला. 20 ओव्हरमध्ये 120 धावांचं किरकोळ आव्हान देखील पाकिस्तानला पूर्ण करता आलं नाही. पाकिस्तानने भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकवले. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज गारद झाले अन् भारताने हायव्होल्टेज सामना खिशात घातला. पराभवानंतर पाकिस्तानची जगभर नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी सुपर 8 फेरी गाठणं अधिकच कढीण झालंय. बाबर अँड कंपनीसाठी नेमकं समीकरण (Pakistan Super 8 Qualification Scenario) कसं असेल पाहुया..

पाकिस्तानने दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात एकही गुण नाही. पाकिस्तानला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. तर पाकिस्तानचा नेट रननेट सध्या -0.150 आहे. अशातच आता पाकिस्तानला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. पाकिस्तान कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध दोन हात करेल. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. तसेच पाकिस्तानला क्वालिफाय करायचा असेल तर युएसए आणि कॅनडा यांना आगामी प्रत्येक सामने हरावे लागतील. 

पाकिस्तानने आगामी दोन्ही सामन्यात विजय जरी मिळवला तरी देखील फायदा होणार नाही. पाकिस्तानला मोठ्या रेन रननेटने सामने जिंकावं लागेल. युएसएने दोन सामने जिंकले असल्याने त्यांचे देखील 4 गुण आहेत. त्यामुळे युएसएने एखादा सामना जिंकला तरी पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागेल. टीम इंडियासाठी आगामी दोन सामने सोपे असणार आहेत. टीम इंडियाचा सामना कॅनडा आणि युएसएविरुद्ध होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाने सुपर 8 चं तिकीट जवळजवळ निश्चित केलंय.

गॅरी कर्स्टन म्हणाले...

गोलंदाजी आणि फलंदाजी करताना फार चांगले निर्णय घेण्यात आले नाहीत. तुमच्या हातात सामना होता, आठ विकेट हातात होत्या, त्यावेळी योग्य निर्णय घेणं हाच खरा खेळ आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताय. जर तुम्ही अशा चुका केल्या तर त्याची किंमत मोजावी लागते, असं गॅरी कर्स्टन म्हणाले.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.

Read More