Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

तुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. मात्र आता याचं उत्तर कुलदीप यादवने दिलं आहे.   

तुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. याचं कारण रोहितने अर्जेंटिनाचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सीचा 2022 फिफा विश्वचषक स्पर्धेतील आयकॉनिक सेलिब्रेशनची कॉपी केली असा काहींचा दाव होता, तर काहींच्या मते ते 'रिक फ्लेअर स्ट्रट'सारखं होतं. पण अखेर भारतीय गोलंदाज कुलदीप यादवने या प्रश्नाचं उत्तर देत वादाला पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना कुलदीप यादवने याचा उलगडा केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेडल दिलं जात असताना रोहितच्या शेजारी उभा असलेला कुलदीप यादव भारतीय कर्णधाराला मेस्सीने दोन वर्षांपूर्वी अर्जेंटिनाने फिफा जिंकल्यावर जसा आनंद साजरा केला होता तसंच सेलिब्रेशन करताना सांगत असल्याचं दिसत आहे. अर्जेंटिनाने कतारमध्ये फ्रान्सचा पराभव करत वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली होती. यावेळी कुलदीप रोहित शर्माला मेस्सीने सेलिब्रेशन कसं केलं होतं हे दाखवतानाही दिसत आहे. रोहितने ट्रॉफी घेताना अगदी हुबेहूब ही नक्कल केली. रोहितचा हा व्हिडीओ काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झला होता. 

यावेळी अनेकांनी त्याने मेस्सीला कॉपी केल्याचा दावा केला. तर दुसरीकडे WWE लीजेंड रिक फ्लेअरने स्वतः दावा केला की रोहितने त्याच्याकडून सेलिब्रेशनची कल्पना घेतल्याचं म्हटलं. त्याने हे सिद्ध करण्यासाठी ते सेलिब्रेशन पुन्हा एकदा करुन दाखवलं. 

सोशल मीडियावर ही चर्चा रंगलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान कुलदीप यादवला हा प्रश्न विचारला. गुरुवारी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या भेटीत पंतप्रधानांनी कुलदीपला विचारलं की, "भारतीय कर्णधाराला डान्स करायला लावायची तुझी हिंमत कशी झाली?". यानंतर कुलदीप यादव हसू लागला होता. नंतर त्याने रोहितला आपण काय सांगितलं याचा खुलासा केला.  

"जेव्हा रोहितने मला सांगितलं की आपण काहीतरी (सेलिब्रेशन) करायला हवे, तेव्हा मी एक सल्ला दिला. पण मी सांगितल्याप्रमाणे त्याने केले नाही," असं कुलदीपने सांगताच तिथे एकच हशा पिकला.

तत्पूर्वी संभाषणादरम्यान, रोहितने विश्वचषक ट्रॉफी घेण्यासाठी जाताना केलेल्या डान्सबद्दल सांगितलं होतं. "आमच्यासाठी हा फार मोठा क्षण होता. आम्ही कित्येक काळापासून या क्षणाची वाट पाहत होतो. खेळाडूंनी मला आपण फक्त साधेपणे न जाता काहीतरी वेगळं करायला हवं असं सुचवलं," असं रोहित म्हणाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी रोहित शर्माला ही नक्की कोणाची कल्पना होती असं विचारलं. त्यावर त्याने ही चहल किंवा कुलदीप यादवची होती असं म्हटलं. 

Read More