Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 World Cup: जडेजा, बुमराह बाहेर, कशी असेल वर्ल्डकपसाठी टीमची Playing 11?

 2022 च्या T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसलेत.

T20 World Cup: जडेजा, बुमराह बाहेर, कशी असेल वर्ल्डकपसाठी टीमची Playing 11?

T20 World Cup: 2022 च्या T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसलेत. भारतीय टीमचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे T20 वर्ल्डकपमधून स्पर्धेतून बाहेर पडलेत. अशा परिस्थितीत आता टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हनही बदलावी लागणार आहे. 

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे 11 प्लेइंग असं दिसणार

टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. त्यानंतर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडिया हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागणार आहे.

सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज आणि धोकादायक सामना फिनिशर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी येईल. अष्टपैलू अक्षर पटेल 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल.

या गोलंदाजांचा टीममध्ये असेल समावेश

युझवेंद्र चहलची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनर म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. युझवेंद्र चहल टी-20 वर्ल्डकपमध्ये प्रतिस्पर्धी टीमसाठी धोकादा.क ठरू शकतो. तो T20 वर्ल्डकपदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर कहर करू शकतो. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होणं जवळपास निश्चित आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

Read More