Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित

T20 World Cup 2022 India In Semi Final: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगात आला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. पण अनेकदा पावसामुळे गणित बिघडून जातं. त्यामुळे जर तरच्या गणितात गुणांसोबत संघाची धावगतीही महत्त्वाची ठरते. भारताच्या गटात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) प्रबल दावेदार आहेत.

T20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित

T20 World Cup 2022 India In Semi Final: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगात आला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. पण अनेकदा पावसामुळे गणित बिघडून जातं. त्यामुळे जर तरच्या गणितात गुणांसोबत संघाची धावगतीही महत्त्वाची ठरते. भारताच्या गटात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) प्रबल दावेदार आहेत. तर बांगलादेश (Bangladesh), झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि नेदरलँड (Netherland) हे तीन संघ प्रबळ दावेदारांपैकी एकाचं गणित बिघडवू शकतात. त्यापैकी दोन संघाची वर्णी उपांत्य फेरीत लागेल, असा अंदाज क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत करत या स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु केली आहे. भारतीय संघाचे सुपर 12 फेरीतील पुढील चार सामने दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि नेदरलँडसोबत होणार आहे. पाकिस्तानला पराभूत केल्याने भारताच्या पारड्यात 2 गुण जमा झाले असून धावगती +0.050 इतकी आहे. त्यामुळे भारताने आणखी तीन सामने जिंकले तर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.

सुपर 12 फेरीतून उपांत्य फेरीत जाणाऱ्या संघांची निवड सर्वप्रथम गुणांवर होईल. त्यापैकी एका संघाचे 10, तर एका संघाला 8 गुण मिळावावे लागतील, हे सर्वसाधारण गणित आहे. दहा गुण मिळवण्याची संधी फक्त भारत आणि बांगलादेश या दोन संघाकडेच आहे. कारण या दोन्ही संघांची सुपर 12 फेरीतील पहिला सामना जिंकला आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येक 1 गुण मिळाला आहे. तसेच धावगतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत चुरस असणार आहे. 

IND vs PAK : "टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार"

भारत कसा पोहोचेल उपांत्य फेरीत?

भारतानं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे/नेदरलँड या तीन संघांना पराभूत केलं, तर  उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. एकूण चार सामने जिंकल्यानंतर भारताच्या पारड्यात 8 गुण जमा होतील. त्याचबरोबर भारताचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.  दुसरीकडे पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँडनं प्रत्येकी एक सामना गमावला तर हे गणित आणखी सोपं होईल.

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक हुड्डा.

Read More