Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 World Cup 2021: विराट सेनेकडून पाकिस्तान संघाला 152 धावांचं आव्हान

 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला विराट सेनेकडून 152 धावांचं आव्हान 

T20 World Cup 2021: विराट सेनेकडून पाकिस्तान संघाला 152 धावांचं आव्हान

दुबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. अत्यंत चुरशीचा सामना सुरू आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. शाहिन आफ्रिदीला पहिल्यांदा बॉलिंगसाठी उतवण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला. के एल राहुल आणि हिटमॅन रोहित शर्माची विकेट शाहिनने काढली. 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला विराट सेनेनं 152 धावांचं आव्हान दिलं आहे.

के एल राहुलने 3, रोहित शून्य, विराट कोहलीने 49 बॉलमध्ये 57 धावा केल्या. सूर्य कुमार यादवने 8 बॉलच्या मदतीने 11 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि विराट कोहलीने टीम इंडियाचा डाव सावरला. पंतने 2 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 30 बॉलमध्ये 39 धावा केल्या. 

रविंद्र जडेजाने 13 बॉलमध्ये 13 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 8 बॉलवर 11 धावा केल्या आणि तोही तंबुत परतला. विराट कोहलीची विकेट शाहिनने काढली. टीम इंडियाच्या गोलंदाजांना आता आपलं कौशल्य दाखवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यासाठी टीम इंडियाला मास्टर प्लॅन तयार करावा लागणार आहे. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार),सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमां, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हारिस रऊफ आणि शाहिन आफ्रिदी

Read More