Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ब्लॅक कॅप्स संघातून 'हा' धडाकेबाज फलंदाज बाहेर

न्यूझीलंड विरुद्ध सामना जिंकण्याचा मार्ग सोपा... 2 दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे खेळणं अनिश्चित

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ब्लॅक कॅप्स संघातून 'हा' धडाकेबाज फलंदाज बाहेर

दुबई: विराट सेनेला पाकिस्तान विरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ब्लॅक कॅप्स संघाचा पाकिस्ताननंही पराभव केला आहे. पाकिस्तानने 5 विकेट्सने सामना जिंकला आहे. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया असा सामना होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे. 

न्यूझीलंड संघातील घातक गोलंदाज आणि धडाकेबाज फलंदाज असे दोन खेळाडू संघातून बाहेर गेले आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात दोन खेळाडू जखमी झाल्यामुळे पुढचा सामना ते खेळू शकणार नाहीत. त्यांना आराम देण्यात येणार आहे. 

न्यूझीलंड संघाला मोठा झटका लागला आहे. धडाकेबाज फलंदाज मार्टिन गुप्टिल याच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात तो खेळेल की नाही याबाबत शंका आहे.

शारजाहच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध सामन्यात गुप्टिलने 17 बॉलमध्ये 20 धावा केल्या. या सामन्याच्या पॉवरप्लेदरम्यान हरिस रौफचा एक चेंडू गप्टिलच्या पायाला लागला आणि तो जखमी झाला. या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

सामन्यानंतर न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, "खेळाच्या शेवटी दुखापत झालेला गुप्टिल थोडा अस्वस्थ दिसत होता आणि आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत." येत्या 24 ते 48 तासात दुखापतीबाबत सांगणे कठीण आहे.

दुसरा झटका म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडला. न्यूझीलंड क्रिकेटरने दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसनला सोमवारी रात्री सरावानंतर पायामध्ये दुखापत असल्याचं जाणवलं. 

या दुखापतीनंतर फर्ग्युसनच्या पायाचा एमआरआय स्कॅन करण्यात आला ज्यामध्ये ही दुखापत समोर आली. ही दुखापत बरी होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागण्याची शक्यता आहे.

Read More