Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अजून वर्ल्ड कप जिंकायचाय पण गावस्कर म्हणतात, 'पांड्याला काढा अन्....'

लिटल मास्टर का म्हणत आहेत पांड्याला काढा? जाणून घ्या!

अजून वर्ल्ड कप जिंकायचाय पण गावस्कर म्हणतात, 'पांड्याला काढा अन्....'

T-20 World Cup 2022 : वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा दुसरा सामना 27 ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध होणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी अष्टपैलू हार्दिक पांड्या मासपेशी ताणल्या गेल्याने वेदनेने त्रस्त असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी कर्णधार रोहित शर्माला सावध केलं आहे.

जर हार्दिक पांड्याला त्रास होत असेल तर त्याला विश्रांती द्यावी कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना मोठा आहे. T20 मध्ये  कोणत्याही संघाला हलक्यात घ्यायला परवडणार नाही. जर हार्दिक पांड्या नसेल तर दिनेश कार्तिक पाचव्या क्रमांकावर तुमच्यासाठी येईल. जर लवकर विकेट गमावल्या तर तुमची फलंदाजी कमकुवत होऊ शकते, त्यामुळे मला पांड्याच्या जागी दीपक हुड्डाला संधी द्यावी, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. 

हार्दिक संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असून मागील सामन्यानमध्ये हार्दिकने चमकदार कामगिरी केली होती. आधीच जडेजा आणि बुमराहसारखे मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. पांड्याला दुखापत झाली तर भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे पांड्याला नेदरलँडविरूद्धच्या सामन्यामध्ये विश्रांती दिली तर फायद्याचं ठरू शकतं. 

दुसरा सामना नेदरलँडसोबत असणार आहे मात्र संघाला हलक्यात घेणं भारताला परवडणारं नाही. कारण वेस्ट इंडिजसारखी तगडी टीम स्पर्धेच्या बाहेर झाली आहे. त्यात पावसाने मध्येत हजेरी लावली तर काहीही निकाल लागू शकतो, पावसामुळे इंग्लंडचा आयर्लडकडून पराभव झाला आहे. त्यामुळे रोहितला सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत. संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More