Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NZ : शतक झळकावल्यानंतर Suryakumar Yadav झाला भावूक! VIDEO व्हायरल

सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. दरम्यान टी-20 मध्ये दुसरं शतक झळकावल्यानंतर सूर्यकुमार भावूक झाला.

IND vs NZ : शतक झळकावल्यानंतर Suryakumar Yadav झाला भावूक! VIDEO व्हायरल

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता. त्या सामन्यात टॉसही होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी मिळवायचीये. न्यूझीलंडने आज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. दरम्यान टी-20 मध्ये दुसरं शतक झळकावल्यानंतर सूर्यकुमार भावूक झाला.

Suryakumar Yadav ची तुफान फलंदाजी

सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली आहे. शिवाय आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्येही तो अव्वल स्थानावर आहे. आपला फॉर्म कामय ठेवत त्याने शतक ठोकलंय. टीम इंडिया कठीण परिस्थितीत असताना पुन्हा एकदा धावून आलाय. सूर्याने 51 बॉल्समध्ये 111 रन्सची खेळी केली. यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्सचा समावेश आहे.

शतक मारल्यानंतर सूर्याकुमारने केलं सेलिब्रेट

शतक मारल्यानंतर Suryakumar Yadav ने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे. जसे 100 रन्स पूर्ण झाले त्यानंतर सूर्याने हेल्मेट काढलं आणि तिरंग्याला किस केलं. यासोबतच त्याने बॅट हवेत झळकावली आणि सोबत असलेल्या हार्दिक पंड्याला कडकडून मिठी मारली. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेला हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी सूर्यकुमार भावूक झाला होता.

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2nd T20:) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर दोन्ही संघ प्रथमच अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहेत.  20 ओव्हर्समध्ये भारताने 6 विकेट गमावून 191 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारच्या शतकामुळे हे शक्य झालं.

Read More