Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Sunil Gavaskar: विराट आणि रोहितचं टी-ट्वेंटी करियर संपलंय का? सुनिल गावस्कर स्पष्टच म्हणाले...

IND vs NZ:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-ट्वेंटी (T20) मालिका. विराट कोहली आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-ट्वेंटी मालिकेत संधी देण्यात आली नाही. 

Sunil Gavaskar: विराट आणि रोहितचं टी-ट्वेंटी करियर संपलंय का? सुनिल गावस्कर स्पष्टच म्हणाले...

Sunil Gavaskar On Rohit Sharma And Virat Kohli: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा सेमीफायनलमध्ये लाजिरवाणा पराभव झाला होता. हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलंय. बीसीसीआयने (BCCI) निवड समिती बरखास्त केली आणि नव्या समितीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर टीम इंडियामध्ये अमुलाग्र बदल दिसून येत आहेत. हार्दिक पांड्याचं  (Hardik Pandya) प्रमोशन झाल्याचं दिसून आलं. (sunil gavaskar on rohit sharma and virat kohli t20 international future marathi news)

नवी निवड समिती स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) डावलत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याला कारण ठरलंय, भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिका. विराट कोहली आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-ट्वेंटी मालिकेत संधी देण्यात आली नाही.  हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करत असताना देखील यांना संधी न देण्यात आल्याने  विराट आणि रोहितचं टी-ट्वेंटी करियर ( T20 international) संपलंय का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. अशातच आता भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले Sunil Gavaskar ?

मी ज्या प्रकारे पाहतो, पुढील टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आहे. आलेली नवीन निवड समिती युवा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छित आहे. याचा अर्थ विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा यापुढे विचार केला जाणार नाही. 2023 मध्ये त्याचा फॉर्म चांगला राहिला तर त्याला संघात राहावं लागेल, असं सुनिल गावस्कर म्हणाले आहेत.

आणखी वाचा - काश मी पहिल्याप्रमाणे....; टीम इंडियातून सतत बाहेर असलेल्या Ajinkya Rahane ने व्यक्त केली खदखद

दरम्यान, सिलेक्टर्सला मोठ्या स्पर्धेसाठी या दोघांना विश्रांती द्यायची आहे. जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांना नवी सुरुवात करता येईल. याचा टीम इंडियाला (Team India) खूप फायदा होईल, असंही मत सुनिल गावस्कर यांनी नोंदवलं आहे. विराट आणि रोहित सध्या टीम इंडियाचे सिनियर खेळाडू आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्याच्या नादात बीसीसीआय दोन स्टार खेळाडूंचं करियर खराब करते का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Read More