Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Sunil Gavaskar on Sarfaraz Khan: '...तर मग फॅशन शोमध्ये जा,' सरफराजवरुन सुनील गावसकरांनी सुनावले खडेबोल

सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या तीन मालिकांमध्ये 2441 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीची नजर त्याच्यावर पडलेली नाही. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली असून बीसीसीआयला खडेबोल सुनावले आहेत  

Sunil Gavaskar on Sarfaraz Khan: '...तर मग फॅशन शोमध्ये जा,' सरफराजवरुन सुनील गावसकरांनी सुनावले खडेबोल

Sunil Gavaskar on Sarfaraz Khan: भारतीय क्रिकेटर सरफराज खान (Sarfaraz Khan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराज खान जबदरस्त कामगिरी करत असल्याने त्याचं कौतुक केलं जात आहे. पण यानंतरही सरफराज खानला भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या तीन मालिकांमध्ये 2441 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीची नजर त्याच्यावर पडलेली नाही. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली असून बीसीसीआयला खडेबोल सुनावले आहेत. 

भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी (IND vs AUS Test Series) मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघात ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्थान देण्यात आलं आहे. पण सरफराजला मात्र संधी देण्यात आलेली नाही. सरफराजच्या फिटनेसचं कारण देत त्याला संधी नाकारली जात असल्याने क्रिकेटप्रेमी तसंच अनेक दिग्गज खेळाडू नाराजी जाहीर करत आहेत. 

India vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावसकरही (Sunil Gavaskar) सरफराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवड समितीला खडेबोल सुनावले असून कोणत्याही क्रिकेटरला जो तंदरुस्त आहे की नाही याच्या आधारे निवडलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. एखाद्याचं शरीर पाहून त्याची निवड केली जाऊ नये असंही त्यानी सांगितलं आहे. ते म्हणालेत की "बीसीसीआयला संघात सडपातळ मुलं हवी असतील तर त्यांनी फॅशन शोमध्ये गेलं पाहिजे".

'यो-यो चाचणी हा एकमेव मापदंड असू नये'

सुनील गावसकर म्हणालेत की "जर तुम्ही अनफिट असाल तर तुम्ही शतक करु शकणार नाही. यामुळेच क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा आहे. जर तुम्ही यो-यो किंवा इतर कोणती चाचणी करत असाल तर मला काही समस्या नाही. पण यो-यो चाचणी हा एकमेव मापदंड असू शकत नाही. तो खेळाडू क्रिकेटसाठी पूर्पणणे फिट आहे याची खात्री केली पाहिजे. तो जो कोणी खेळाडू असेल, जर तो क्रिकेटसाठी फिट असेल तर काही समस्या असण्याचं कारण नाही". 

'मॉडेल आणून त्यांच्या हातात बॉल आणि बॅट द्या'

"शतक ठोकल्यानंतरही तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उभा राहतो. पुन्हा मैदानात येत आपण क्रिकेटसाठी फिट असल्याचं तो दाखवून देत आहे. जर तुम्हाला फक्त सडपातळ मुलं हवी असतील तर तुम्ही एखाद्या फॅशन शोमध्ये जावा. तिथे जाऊन मॉडेलच्या हातात बॅट आणि बॉल द्या. त्यानंतर त्यांना संघात सामावून घ्या. तुमच्याकडे प्रत्येक आकाराचे क्रिकेटर आहेत. तुम्ही आकारावर जाऊ नका. धावा आणि विकेट्सच्या आधारे खेळाडूंची निवड झाली पाहिजे," असा सल्ला गावसकरांनी दिला आहे.

Read More