Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 World Cup 2024: कांगारूंना जोर का झटका, 'या' वर्ल्ड कप विनर खेळाडूचा होणार पत्ता कट?

Australia T20 World Cup Squad 2024:  टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी येत्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोन मोठे बदल होणार आहे, अशी माहिती समोर आलीये.

T20 World Cup 2024: कांगारूंना जोर का झटका, 'या' वर्ल्ड कप विनर खेळाडूचा होणार पत्ता कट?

Australia T20 World Cup Squad 2024: नुकतंच आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) न्यूझीलंडच्या संघाची घोषणा झाली. न्यूझीलंडचा संघ केन विलियमन्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. आता येत्या 2 दिवसात बाकी संघांचा स्कॉड देखील जाहीर होईल. अशातच आता ऑस्ट्रेलिया संघाला (Australia Cricket Team) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून स्टार खेळाडूला वगळंल जाण्याची शक्यता वर्तविण्यात येतीये. ऑस्ट्रेलियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देण्याची ताकद ठेवणारा खेळाडू संघातून डावलला जाणार आहे. 

होय... मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीवन स्मिथ टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. सध्याचा टी-20 फॉरमॅट पाहता, स्मिथला वगळलं जावं असं काही तज्ज्ञांनी सुचवलं आहे. त्यामुळे आता स्मिथच्या (Steve Smith) जागी जॅक फ्रेजर-मॅक्गर्क (Jake Fraser-McGurk) या स्टार खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. जॅकने दिल्लीकडून खेळताना अफलातून कामगिरी केली होती. आपल्या आक्रमक कामगिरीच्या जोरावर त्याने विरोधी संघात धडक भरवली होती.

ऑस्ट्रेलिया संघात जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिस हे खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत. तर मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंना सूर गवसत नाहीये. त्याचबरोबर स्पेन्सर जॉन्सन, कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड या खेळाडूंनी देखील झलक दाखवत सिलेक्टर्सला संकेत दिले आहेत.

ऑस्ट्रेलियाचं वेळापत्रक (Australia T20 WC schedule)

6 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस
9 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस
12 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, सर विव्ह रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा
16 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलँड, डॅरेन सॅमी स्टेडियम, सेंट लुसिया

जाहीर झालेला न्यूझीलंडचा संघ

केन विलियमसन (कर्णधार), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, माइकल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, डेवन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, टिम साऊदी, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅटनर, ईश सोढी.

Read More