Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ruturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली.

Ruturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली. विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन म्हणून हा या मोसमातील पहिला सामना होता. ऋतुराजा याआधी या मोसमात धावा करण्यात अपयशी ठरत होता. मात्र धोनी कॅप्टन म्हणून येताच ऋतुराजचं भाग्य पालटलं. (srh vs csk chennai opener ruturaj gaikwad scores 99 as soon as mahendra singh dhoni returns as captain)

ऋतुराजचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. ऋतुराजने 57 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 99 धावांची शानदार वादळी खेळी केली. ऋतुराजचं शतक हुकलं. मात्र चेन्नईच्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 

इतकंच नाही, ऋतुराजने डेवोन कॉनवेसोबत 182 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेली ही भागीदारी या मोसमातील विक्रमी भागीदारी ठरली. 

ऋतुराजला रवींद्र जाडेजाच्या कॅप्टन्सीत विशेष काहीच करता आलं नाही. मात्र धोनीच्या नेतृत्वात केलेल्या या खेळीनंतर सोशल मीडियावर अनेक भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.

ऋतुराजने या मोसमातील 9 सामन्यात आतापर्यंत 237 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराज गेल्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर होता. एका मोसमात सर्वाधिक करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते. मात्र या मोसमात ऋतुराजला अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे ऋतुराजकडून आगामी उर्वरित सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

 

Read More