Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...

Shubman Gill: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यात काय नातं आहे? यावर शुभमन गिलने गुपित उघड केलंय.

Rishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...

Rishabh Pant Urvashi Rautela: भारतात क्रिकेट आणि बॉलिवूड (Cricket and Bollywood) यांचं एक वेगळंच नातं आहे. अनेक क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येत लग्नगाठ जुळवली. याची डझनभर उदाहरणं पहायला मिळतात. यामध्ये विराट कोहलीपासून ते मोहम्मद अजहरुद्दीन यांची नावं दिसतात. अशातच आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या येत आहेत. यावर आता भारतीय युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) मोठं वक्तव्य केलंय.

शुभमन गिल सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड (NZ vs IND) दौऱ्यावर आहे. दौऱ्याआधी एका पंजाबी कार्यक्रमात शुभमन गिलला बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. त्यावेळी अँकरने पंतला ऋषभ आणि उर्वशीच्या नात्यावर हळूच प्रश्न उकरून काढला. आजकाल एखाद्या अभिनेत्रीचे नाव घेऊन ऋषभ पंतला खूप चिडवलं जातं, टीममध्ये त्याच्यासोबतही असे घडते का?, असं अँकरने विचारलं.

आणखी वाचा - भावा, Urvashi Rautela तुला बोलवतेय, चाहत्याने डिवचलं मग Rishabh Pant नेही सुनवलं

अँकरच्या प्रश्नावर बोलताना शुभमनने (Shubman Gill On Rishabh And Urvashi) उत्साहाच्या भरात उत्तर दिलं. ती स्वत:हून असं करते. त्याचा ऋषभशी काहीही संबंध नाही. ती स्वतः मला चिडवण्यासाठी काहीतरी सांगत असते, शुभमन पंजाबी भाषेत म्हणताना दिसत आहे. त्यावर अँकरने आणखी एक प्रश्न विचारला. ऋषभ त्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतो का? असा सवाल विचारला गेला.

पाहा Video -

दरम्यान, अँकरच्या प्रश्नावर शुभमनने उत्तर दिलं. काही फरक पडत नाही कारण त्याला माहित आहे की दोघांच्यात (rishabh pant and urvashi rautela) काहीही नाही. त्यानंतर अँकर आणि गिल दोघेही हसायला असं व्हिडीओमध्ये दिसतंय. वर्ल्ड कपमध्ये ऋषभला एका प्रेक्षकाने उर्वशीच्या नावाने चिडवलं होतं. त्यावरून देखील ऋषभ भडकल्याचं दिसून आलं होतं.

Read More