Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik बावचळला! थेट मॅच फिक्सिंगचे आरोप; चौथ्या ओव्हरमध्ये असं काय घडलं?

Shoaib Malik No Ball : बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये शोएब मलिकने स्पॉट फिक्सिंग (Shoaib Malik Controversy) केल्याचा आरोप केला जातोय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया...

तिसऱ्या लग्नानंतर Shoaib Malik बावचळला! थेट मॅच फिक्सिंगचे आरोप; चौथ्या ओव्हरमध्ये असं काय घडलं?

Shoaib Malik Controversy  : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी स्टार क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शोएबनं 20 जानेवारी 2024 रोजी भारताच्या सानिया मिर्झा हिच्यासोबत घटस्फोट घेऊन अभिनेत्री सना जावेदसोबतचे (Sana Javed) लग्न केलं. त्यामुळे फक्त भारतातच नाही पाकिस्तानात देखील शोएब मलिकला नावं ठेवली जात आहेत. अशातच आता शोएब मलिकवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये शोएब मलिकने स्पॉट फिक्सिंग (Shoaib Malik No Ball) केल्याचा आरोप केला जातोय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया...

झालं असं की, बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये 22 जानेवारी रोजी फॉर्च्यून बरीशाल आणि खुलना टायगर्स यांच्यात सामना खेळवला जात होता. या सामन्यात फॉर्च्यून बरीशालने 187 धावांची धुंवाधार खेळी केली. त्याला प्रत्युत्तर देताना खुलना टायगर्सने 18 व्या ओव्हरमध्ये खेळ खल्लास केला. या सामन्यात फॉर्च्यून बरीशालकडून खेळणाऱ्या शोएब मलिकने पावरप्लेमध्ये 4 थी ओव्हर हाताशी घेतली. त्या ओव्हरमध्ये शोएबने चक्क तीन नो बॉल केले. संपूर्ण सामन्यात सर्वात महागडी ओव्हर मलिकची ठरली. यामुळे सध्या मलिकवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप केले जात आहे.

चौथ्या ओव्हरमध्ये नेमकं काय झालं?

शोएबने पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा दिल्या. यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथा चेंडू नो बॉल होता, जो त्याने पुन्हा टाकला आणि त्यावर एकही धाव दिली नाही. 5 वा चेंडू देखील निर्धाव होता. पण, षटकातील शेवटचा चेंडू टाकताना त्याने सलग दोन नो बॉल केले. इतकंच नाही तर त्यावर 6 धावाही गेल्या. शेवटचा चेंडू टाकला तेव्हा फलंदाजाने षटकार मारला. अशाप्रकारे शोएब मलिकने 3 वेळा नो बॉल टाकले अन् एका षटकात 18 धावा दिल्या.

फॉर्च्यून बरीशाल (प्लेइंग इलेव्हन): तमीम इक्बाल (C), इब्राहिम झद्रान, मेहदी हसन मिराझ, सौम्या सरकार, मुशफिकुर रहीम (WK), शोएब मलिक, महमुदुल्लाह, दुनिथ वेललागे, खालेद अहमद, रकीबुल हसन, मोहम्मद इम्रान.

खुलना टायगर्स (प्लेइंग इलेव्हन): अनामूल हक (C), एविन लुईस, शाई होप (WK), अफिफ हुसैन, महमुदुल हसन जॉय, हबीबुर रहमान सोहन, फहीम अश्रफ, नाहिदुल इस्लाम, मुकिदुल इस्लाम, नसुम अहमद, ओशाने थॉमस.

Read More