Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शोएब मलिकवर खरंच कारवाई झाली? मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर फ्रँचायझीने स्पष्टच सांगितलं, 'त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता...'

Bangladesh Premier League : शोएब मलिक (Shoaib Malik) हा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. सोशल मीडियावर फक्त अफवा पसरत आहेत, असं संघाचे (Fortune Barishal) मालक मिझानुर रहमान यांनी अधिकृत व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

शोएब मलिकवर खरंच कारवाई झाली? मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर फ्रँचायझीने स्पष्टच सांगितलं, 'त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता...'

Fortune Barishal On Shoaib Malik :  बांगलदेश प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या शोएब मलिक (Shoaib Malik) ज्या संघातून खेळत होता. त्या संघाने मलिकबरोबरचा करार रद्द केल्याची माहिती समोर आली होती.  22 जानेवारीला मीरपूरमध्ये खुलना टायगर्सविरुद्ध  (Khulna Tigers) खेळवण्यात आलेल्या एका सामन्यात शोएब मलकिने सलग तीन नो बॉल टाकल्याने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केल्याचं पहायला मिळालं. अशातच आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

मॅच फिक्सिंगच्या संशयावरून बांगलादेश प्रीमियर लीग संघ फॉर्च्युन बरीशालने पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिक सोबतचा कोणताही करार रद्द नाही, अशी माहिती संघाचे मालक मिझानुर रहमान यांनी दिली आहे. अधिकृत व्हिडिओ जारी करत त्यांनी स्वत: याची माहिती दिली.

मलिक हा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. सोशल मीडियावर फक्त अफवा पसरत आहेत, असं संघाचे मालक मिझानुर रहमान यांनी अधिकृत व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानच्या शोएब मलिकने स्पर्धेच्या मीरपूर टप्प्यात बीपीएल 2024 मध्ये फॉर्च्यून बरीशालसाठी 3 सामने खेळले होते. मात्र, मागील सामन्यात त्याने चौथ्या ओव्हरमध्ये 3 नो बॉल टाकल्याने वाद पेटला होता.  

नेमकं काय झालं होतं?

बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये 22 जानेवारी रोजी फॉर्च्यून बरीशाल आणि खुलना टायगर्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात फॉर्च्यून बरीशालकडून खेळणाऱ्या शोएब मलिकने पावरप्लेमध्ये 4 थी ओव्हर टाकली. शोएबने पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा दिल्या. यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथा चेंडू नो बॉल होता, जो त्याने पुन्हा टाकला आणि त्यावर एकही धाव दिली नाही. 5 वा चेंडू देखील निर्धाव होता. पण, षटकातील शेवटचा चेंडू टाकताना त्याने सलग दोन नो बॉल केले. इतकंच नाही तर त्यावर 6 धावाही गेल्या.

शोएब मलिकची क्रिकेट कारकीर्द

शोएब मलिक पाकिस्तान संघासाठी 35 कसोटी सामने खेळला. यात त्याने 1898 धावा केल्या. तर 32 विकेट घेतल्या. 287 एकदिवसीय क्रिकेटमध्ये शोएबने 7534 धावा आणि 158 विकेट घेतल्या. तर 124 टी20 सामन्यात 2435 धावा आणि 28 विकेट त्याच्या नावावर आहेत. 

Read More